मुंबई इंडियन्सच्या गोटातून खळबळजनक माहिती, हार्दिक पांड्याने सूर्याकडे कॅप्टन्सी सोपवली, समोर आ
IPL 2026 आजच्या सामन्यासाठी DC विरुद्ध हार्दिक पंड्या नाही : आयपीएल 2026 चा 8वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम येथे खेळला जात आहे. मात्र या सामन्यापूर्वीच मुंबईला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik pandya) आजच्या सामन्यातून बाहेर झाला आहे.
हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना टॉससाठी मैदानात उतरला. दुसरीकडे दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
🚨 नाणेफेक 🚨@DelhiCapitals नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला @mipaltan सामना 8️⃣ मध्ये
अपडेट्स ▶️ https://t.co/lufWYIGWql#TATAIPL | #खेलबिंदास | #DCvMI pic.twitter.com/eaZ7vBEmWE
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 4 एप्रिल 2026
हार्दिक पांड्या का खेळला नाही?
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आजारी असल्यामुळे हा सामना खेळू शकला नाही. टॉसच्या वेळी सूर्यकुमार यादवने याची माहिती देताना सांगितले की, “तो ठीक नाही, त्यामुळे हा सामना खेळत नाही.” मात्र त्याच्या आजाराबद्दल नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.
🚨 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🚨
हार्दिकची तब्येत खराब असल्याने तो आज मैदानात उतरणार नाही. सूर्यकुमार यादव आज कर्णधार असतील. pic.twitter.com/yXAoaWah4L
— मुंबई इंडियन्स (@मिपल्टन) 4 एप्रिल 2026
मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग-11 मध्ये 3 बदल
या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने आपल्या संघात तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. दीपक चाहर, कॉर्बिन बॉश आणि मिचेल सॅन्टनर यांना प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले आहे.
प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
हार्दिक पांड्या या सामन्यात मुंबईकडून खेळत नाहीये. प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, हार्दिकची प्रकृती ठीक नसल्यामुळे तो या सामन्याचा भाग नाही. दिल्लीने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर दीपक चहर, कॉर्बिन बॉश आणि मिचेल सँटनर यांचे मुंबई संघात पुनरागमन झाले आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाची प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार
मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.