उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं राजकारण, सत्ताधाऱ्यांवर पलटवार
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि आमदार उधव ठाकरे (उधव विचार करा) हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित होते. तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील नेत्यांना जेवणाचे निमंत्रण होते. या निमंत्रणानुसार उद्धव ठाकरे सहकुटुंब राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र, येथील बैठकीत उद्धव ठाकरेंना 7 व्या रांगेत बसवल्याने राजकीय वर्तुळातून, सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. आता, या टीकेवरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी पलटवार केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे तिथं मागील रांगेत का बसले होते, याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं. यादरम्यानचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंसह संजय राऊत, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत आहे. त्यामुळे, शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. हिंदुत्व, विचारधारा सोडली की पदरात काय पडलं? शेवटची रांग? असा टोला केशव उपाध्येंनी मारलाय. तर नरेश म्हस्केंनीही एक्स पोस्टवरून खिल्ली उडवली आहे. त्यावर, आता सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पवारसाहेब देखील पाठीमागेच बसले होते
सत्ताधारी नेत्यांचा आरोप हास्यास्पद आहे, कारण ते इनफॉर्मल गेटटुगेदर होते. याठिकाणी पवार साहेब देखील मागे बसलेले होते, अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत होते. तो काही प्रोटोकॉल चा कार्यक्रम नव्हता, कुटुंबासोबत जेवणासाठी आमंत्रण होतं. त्यामुळे, ज्याल जिथे बसायला जागा मिळाली, तिथे ते बसले होते. सिनेमा बघताना आपण मागे बसता की पुढे बसता, असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तसेच, आरोप करणऱ्यांनी सिनेमा बघितला नसेल, असा टोलाही महायुतीच्या नेत्यांना लगावला.
राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंच्या जावयासंदर्भातील प्रश्नावरही आपली भूमिका मांडली. रोहिणीताईंच्या नवऱ्याचा पक्षाशी काही संबंध नाही. पण, राईट टू प्रायव्हेसी हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. मोबाईल पोलिसांनी दुसऱ्या कोणाला दाखवायचा नाही, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. आम्ही कोणाच्या कुटुंबात जाऊन काही बोलत नाही, उद्या तुमचा मोबाईल घेतला तर तो फक्त पोलीस यंत्रणा आणि कोर्ट यांनाच दाखवावा हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, असे म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या आरोपांवरुन सुप्रिया सुळेंनी पलटवार केला आहे.
हेही वाचा
दिल्लीत राज ठाकरेंची चर्चा; राहुल गांधी अन् उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आणखी वाचा
Comments are closed.