लवकरच राजकीय पक्ष सुरू करणार: अण्णामलाई
नवी दिल्ली
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने दुबईतून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून सोमवारी 3.2 किलो सोने जप्त केले आहे. याची किंमत सुमारे 4.03 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी प्रवाशाच्या प्रोफाइलिंगच्या आधारावर त्याला रोखले होते. सामानाच्या तपासणीत एका फ्लोर स्प्रिंगच्या आत लपविण्यात आलेल्या सोन्याच्या छडी हस्तगत झाल्या. फ्लोर स्प्रिंग दरवाजाला आपोआप बंद करणारे एक मॅकेनिकल उपकरण असते. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने गुन्हा नोंद करत पुढील तपास चालविला आहे.
Comments are closed.