आशियाई स्पर्धा तोंडावर, तरी बॉक्सर वाऱ्यावर; हिंदुस्थानी बॉक्सिंगची तयारी कागदावरच अडकली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपल्या, पण तरीही हिंदुस्थानी बॉक्सिंगची तयारी अजूनही कागदावरच अडकली आहे. देशासाठी पदके जिंकणारे बॉक्सर सरावाऐवजी हातावर हात धरून बसले आहेत. निखहत झरीनसारखी जगज्जेती खेळाडूही संताप व्यक्त करत आहे. ही अवस्था हिंदुस्थानी क्रीडा व्यवस्थेच्या निष्काळजीपणाची जाहीर कबुलीच म्हणावी लागेल.

11 ते 15 मेदरम्यान एनआयएस पतियाळा येथे संघनिवडीसाठी ‘असेसमेंट’ प्रक्रिया होणार आहे. मात्र, त्याआधी 25 एप्रिलपासून सुरू होणाऱया राष्ट्रीय शिबिरालाच अद्यापि हिरवा कंदील मिळालेला नाही. ‘साई’ची मंजुरी न मिळाल्याने खेळाडूंची तयारी खोळंबली आहे. दोन वेळची विश्वविजेती निखहत झरीन सध्या हैदराबादमध्ये आहे. पण ना योग्य प्रशिक्षण केंद्र, ना प्रशिक्षक, ना दर्जेदार सराव! देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूची ही अवस्था असेल तर बाकीच्यांचे काय? निखहतने स्पष्ट शब्दांत सांगितले की, शिबीर उशिरा सुरू होणे म्हणजे खेळाडूंचे थेट नुकसान आहे. फिटनेस, तांत्रिक तयारी आणि निवडीची धडपड या सगळ्यावर पाणी फिरत आहे.

Comments are closed.