गोळ्यांचा आवाज तरी पठ्ठ्या जेवत राहिला!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वॉशिंग्टन डीसीमध्ये काल व्हाईट हाऊस कॉरेस्पॉण्डंट्स डिनरदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली. या थरारक घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती सुरक्षारक्षकांच्या पहाऱयातही अतिशय शांतपणे जेवण करत आहे… सॅलड खात आहे. या ‘सॅलड मॅन’ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

जेव्हा अचानक गोळीबाराचा आवाज घुमला, तेव्हा उपस्थित थक्क झाले होते. सुरक्षा कर्मचारी तत्काळ कामाला लागले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह सर्व व्हीआयपींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. हॉलमधील पाहुणे जीव वाचवण्यासाठी टेबलांखाली लपले, अनेकजण जमिनीवर झोपले; पण एक व्यक्ती आपल्या खुर्चीवरून हललीदेखील नाही. ही व्यक्ती म्हणजे मायकल ग्लँट्झ. त्यांनी शांतपणे सॅलड खाणे सुरू ठेवले.

महागडा सूट खराब करायचा नव्हता

मायकल ग्लँट्झ हे ‘क्रिएटिव्ह आर्टिस्ट्स एजन्सी’चे सदस्य आहेत. त्यांना व्हायरल व्हिडीओबद्दल विचारले असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले. त्या संध्याकाळी त्यांनी एक खूप महागडा आणि आलिशान टक्सिडो घातला होता. त्यामुळे जमिनीवर झोपून त्यांना त्यांच्या घडय़ा खराब करायच्या नव्हत्या किंवा ते कपडे घाण करायचे नव्हते.

Comments are closed.