इंडोनेशियामध्ये भीषण अपघात, दोन ट्रेनची समोरासमोर टक्कर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला असून, अपघातामुळे परिसरात भीती आणि घबराट पसरली आहे. रात्री दोन ट्रेनची टक्कर झाली, यामध्ये किमान ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ८१ जण गंभीर जखमी आहेत. अपघात होताक्षणी बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या लोकांना सोडवण्यास मदत केली.

सरकारी रेल्वे कंपनी केएआयच्या (KAI) प्रवक्त्या अण्णा पुरबा यांनी सकाळी स्थानिक टीव्हीला सांगितले की, या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ८१ जण जखमी झाले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न बचाव पथकाकडून सुरू आहेत.

अपघातातून वाचलेल्या एका महिला प्रवाशाने एएफपी (AFP) वृत्तसंस्थेला सांगितले की, हा अपघात भयानक होता. ती ज्या ट्रेनमध्ये होती, तिची दुसऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेनला धडक बसली, त्यामुळे डब्यांमध्ये लोक अडकले.

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कंपनीचे प्रवक्ते फ्रानोटो विबोवो यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे क्रॉसिंगवर एका टॅक्सीने ट्रेनला हलकी धडक दिली, ज्यामुळे ती रुळांवर थांबली आणि त्यानंतर दुसरी ट्रेन तिला धडकली. या अपघातामुळे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. बचाव पथक ऑक्सिजन सिलिंडरची मागणी करत होते आणि रुग्णवाहिकांची लांबच लांब रांग लागली होती.

Comments are closed.