शुद्धीकरणाच्या नावाखाली महिलेवर सामूहिक बलात्कार

  • राजकोट: गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात एका विवाहित महिलेवर ‘शुद्धीकरणा’च्या नावाखाली सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह 9 जणांना अटक केली आहे. पीडित महिलेचा पती आणि त्याचे नातेवाईकही आरोपींमध्ये सामील आहेत. संबंधित महिला पतीला सोडून चोटिला येथे आपल्या साथीदारासोबत राहत होती. कुटुंबीयांनी तिला शोधून पुन्हा वापी येथे आणले होते. मात्र, काही दिवसांनी ती पुन्हा चोटिला येथे गेली. याची माहिती पतीला मिळाल्यानंतर त्याने नातेवाईकांच्या मदतीने महिला आणि तिच्या साथीदाराचा शोध घेत त्यांना सुरेंद्रनगर येथील एका घरात आणले. तेथे ‘शुद्धीकरण विधी’च्या नावाखाली दोघांना मारहाण करण्यात आली. आरोपींनी महिलेच्या साथीदाराला झाडाला बांधले होते. तर महिलेला खोलीत डांबले, त्यानंतर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मारहाण अन् अत्याचाराचे मोबाइलवर चित्रिकरण करण्यात आले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले. व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू करून पीडित महिलेचा शोध घेतला.

 

Comments are closed.