भाजपमध्ये पक्षप्रवेशानंतर संग्राम थोपटेंच्या राजगड कारखान्याला खेळत्या भांडवल कर्जाची हमी; पहिल

मुंबई: नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले संग्राम थोपटे यांना मोठा दिलासा मिळणार आहे. संग्राम थोपटे यांच्या राजगड सरकारी साखर कारखान्याच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जाला राज्य सरकारने हमी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार संग्राम थोपटे यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संग्राम थोपटे यांचा राजगड सहकारी साखर कारखाना अनेक दिवसांपासून अडचणीत होता. अखेर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय होणार आहे. या साखर कारखान्यामुळेच संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला अशीही चर्चा सुरू होती. हा साखर कारखाना अडचणीत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही थकलं होतं. अखेर आज राज्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

अनेक दिवसांपासून हा साखर कारखाना अडचणीमध्ये

मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम थोपटे यांच्या राजगड सरकारी साखर कारखान्याला खेळत्या भांडवलाच्या कर्जाला राज्य सरकारकडून हमी मिळाली आहे. संग्राम थोपटे यांचा हा कारखाना गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत होता, मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जाला हमी देण्याचा निर्णय आता होणार आहे. याच कारखान्यामुळे संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता अशी चर्चा आहे. मंत्रीमंडळाची बैठक सध्या सुरू आहे, या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होणार आहे, राजगड सरकारी साखर कारखाना हा सध्या संग्राम थोपटे यांच्याकडे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा साखर कारखाना अडचणीमध्ये होता.

या साखर कारखान्याला आता  कर्जाला हमी देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आणण्यात आला आहे. संग्राम थोपटे हे गेल्या काही दिवसांपासून, त्यांच्या आधीची पिढी देखील कॉंग्रेसमध्ये होती, ते काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ होते, मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजमध्ये प्रवेश केला, हे कारण सांगितलं जात होतं, थोपटेंचा राजगड सरकारी साखर कारखाना अडचणीत आहे आणि तो वाचवण्यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जात असल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार आज मंत्रीमंडळ बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडला जात आहे.

राजगड कारखान्याच्या कामगारांचे वेतन देखील थकलं आहे. त्यांचं वेतन द्यायला पैसे नाहीत, अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आता थोपटेंच्या भाजप प्रवेशानंतरचा त्यांना पहिला दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कारखान्यासाठी दिलेली हमी किती कोटी रूपयांची आहे ते अद्याप अस्पष्ट आहे. त्यानंतर किती हमी मिळाली ते समोर येईल, आधीही अनेक नेत्यांच्या कारखान्यांसाठी हमी दिली आहे, याप्रकरणी अनेकदा विरोधकांनी टीका केली होती.

https://www.youtube.com/watch?v=rrf1crpxzfw

आणखी वाचा

Comments are closed.