महागाईचा महा-विस्फोट! एप्रिलमध्ये घाऊक महागाई 8.30 टक्क्यांवर, 42 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला

WPI डेटा एप्रिल 2026: देशात महागाईचा दबाव आता अत्यंत वेगाने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. एप्रिल 2016 मध्ये देशाचा घाऊक महागाई दर (WPI) वाढून थेट 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.88 टक्के इतका होता. अवघ्या महिनाभरात झालेली ही वाढ गेल्या 42 महिन्यांचा म्हणजेच साडेतीन वर्षांचा विक्रम मोडणारी ठरली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे या महागाईमागचे मुख्य कारण मानले जात आहे.

WPI Data April 2026: इंधन आणि वीज क्षेत्राचा मोठा वाटा

या महागाईच्या वाढीमध्ये ‘फ्यूल आणि पॉवर’ क्षेत्राचे योगदान सर्वाधिक राहिले आहे. मार्चमध्ये केवळ 1.05 टक्क्यांवर असलेली या क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये थेट 24.71 टक्क्यांवर झेपावली आहे.

पेट्रोल: 32.40 टक्के वाढ.

डिझेल: 25.19 टक्के वाढ.

एलपीजी: 10.92 टक्के वाढ.

यामुळे वाहतूक खर्च वाढून भविष्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

WPI Data April 2026: कच्च्या तेलाचा भडका

खाडी देशांमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी आली आहे. कच्च्या तेलाची घाऊक महागाई एप्रिलमध्ये तब्बल 88 टक्क्यांच्या पुढे नोंदवली गेली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होत असून प्राथमिक वस्तूंची (Primary Articles) महागाई मार्चमधील 6.36 टक्क्यांवरून वाढून 9.17 टक्क्यांवर पोहोचली आहे. तसेच उत्पादित वस्तूंच्या (Manufactured Products) महागाईतही 4.62 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

WPI Data April 2026: खाद्यपदार्थांकडून काहीसा दिलासा

या भीषण महागाईच्या काळात केवळ अन्नधान्य क्षेत्राकडून थोडा दिलासा मिळाला आहे. अन्नधान्याची महागाई (Food Inflation) मार्चमधील 1.85 टक्क्यांवरून वाढून 2.31 टक्के इतकीच राहिली आहे. विशेषतः घाऊक बाजारात कांदा आणि बटाट्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्यापही कमी असल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील महागाई नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.

WPI Data April 2026: मे महिन्यातील महागाईची आकडेवारी 15 जूनला होणार प्रसिद्ध

DPIIT ने दिलेल्या माहितीनुसार, ‘कोअर डब्ल्यूपीआय’ (अन्न आणि इंधन वगळून) 5 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो 43 महिन्यांचा उच्चांक आहे. आता मे महिन्यातील महागाईची आकडेवारी 15 जून रोजी प्रसिद्ध केली जाईल, ज्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Gold Market Trend: सुवर्णनगरीचा ‘ट्रेंड’ बदलला! लग्नसराईतही ग्राहकांकडून नव्या सोन्याच्या खरेदीला ब्रेक, जुने मोडून नवीन घडवण्यावर भर

Devendra Fadnavis: पुढील सहा महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही; बुलेटवरून विधानभवनात पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सगळंच सांगितलं, विरोधकांना सुनावले खडेबोल

आणखी वाचा

Comments are closed.