नांदेड बार असोसिएशन निवडणुकीत यदुपत अर्धापूरकर यांची अध्यक्षपदी बाजी
नांदेड जिल्हा अभिवक्ता संघटनेच्या २०२६-२८ कार्यकारिणी निवडणुकीत चुरशीच्या लढतीनंतर अखेर निकाल जाहीर झाला असून अध्यक्षपदी यदुपत अर्धापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. एकूण १७८२ मतांपैकी अर्धापूरकर यांना ९५७ मते मिळाली, तर शैलेश देशमुख यांना ६६१ आणि जगजीवन भेडे यांना १४६ मते मिळाली.
उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीत संगमेश्वर डेलमेडे यांनी ७२८ मते मिळवत विजय संपादन केला. त्यांच्याविरोधात महिंद वावळे यांना ५१९ तर निरज भोसीकर यांना ४५६ मते मिळाली. महिला उपाध्यक्ष पदावर दीपाली डोंगावकर यांनी ७५९ मतांसह विजय मिळवला. विजयमाला मनवर यांना ६१५ तर ज्योती सूर्यवंशी यांना ३५० मते मिळाली. सचिव पदासाठी कपिल पाटील यांनी ७०९ मते मिळवत विजय मिळवला. ज्ञानेश्वर देशमुख यांना ३९५, रविंद्र पाटील यांना ३३० आणि मंगेश वाघमारे यांना २९९ मते मिळाली.
संयुक्त सचिव पदावर जगदीश हाके यांनी ६६४ मतांसह विजय संपादन केला. जावेद पठाण यांना ४६८, चांदमुनी सोनसळे यांना ३२४ आणि तहूर पठाण यांना २५७ मते मिळाली. महिला संयुक्त सचिव पदावर सुजाता बागाटे यांनी ७७८ मते मिळवत विजय मिळवला. वृषाली जोशी यांना ३५८, वनिता बोईनवाड यांना ३३२ आणि नगमा सिद्दीकी यांना २४५ मते मिळाली. खजिनदार पदावर मंगेश जामनिक यांनी ६९८ मते मिळवत विजय मिळवला. फेरोज पठाण यांना ४७५, विष्णू पाटील यांना ३९३ आणि शिवकांत किरवले यांना १४७ मते मिळाली.
विशेष सहाय्यक पदासाठी प्रदीप राठोड यांनी ५७३ मते मिळवत विजय मिळवला. जयेश पाटील यांना ५४३, गौतम किनीकर यांना ४१० आणि गणेश जाधव यांना १८३ मते मिळाली. सदस्यपदी अॅड.पवार मुक्ताई नारायणराव,अॅड. गावंडे बाबू धर्माजी, अॅड. मठवाले रामसिंघ पुरणसिंघ,अॅड. पुंडगे रिना सतीश, अॅड. हाटकर प्रिती, अॅड. बोकारे कार्तिक नितीनराव, अॅड.येरेकर सुमेध बळीराम,अॅड.बडो उषा सुरेशराव, अॅड.हाटकर सटवाजी व्यंकटराव, अॅड. सोलगे (पाटील) गंगासागर, अॅड.राठोड संकेत दिलीपराव यांचा विजय झाला. निवडणुकीची मतमोजणी तब्बल ७२ फेर्यांनंतर पूर्ण झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत अभिनंदनाचा वर्षाव केला.
Comments are closed.