एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीचं टोकाचं पाऊल; घरातचं पंख्याला…; सोलापुरात
सोलापूर: वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने गळफास (Solapur Crime news) घेत आपलं जीवन संपवलं आहे. जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोरील हा प्रकार घडला. साक्षी सुरेश मैलापुरे असे मयत तरुणीचे नाव आहे. साक्षी सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. अभ्यासात हुशार असणाऱ्या साक्षीने आत्महत्या का केली? हे अजूनही स्पष्ट (Solapur Crime news)झालेलं नाही. या घटनेची सोलापूरच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.(Solapur Crime news)
मिळालेल्या माहितीनुसार, एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या साक्षी सुरेश मैलापुरे (वय २५, रा. जुळे सोलापूर, आयएमएस शाळेजवळ) हिने राहत्या घरामध्ये छताच्या पंख्याला स्कार्फच्या साह्याने गळफास (Solapur Crime news) घेऊन आपलं जीवन संपवलं. ही घटना जुळे सोलापूर येथील आयएमएस शाळेसमोर काल (मंगळवारी, ता ७) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. साक्षीने गळफास घेतल्याचे सुरुवातीला आईला दिसले. त्यानंतर तत्काळ तिला नातेवाइकांच्या साहाय्याने फासातून सोडवून शासकीय शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.(Solapur Crime news)
Solapur Crime news: आईने हा प्रकार पाहिला आणि तत्काळ रूग्णालयात नेलं…
मंगळवारी (ता. ७ ऑक्टोबर) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर साक्षी आपल्या कुटुंबासह राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, साक्षीने छताच्या पंख्याला स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. घरात आईने हा प्रकार पाहिला आणि तत्काळ नातेवाइकांच्या मदतीने तिला फासावरून खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
साक्षी ही अभ्यासात अत्यंत हुशार, शांत आणि मेहनती विद्यार्थिनी होती. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. साक्षीने एवढ्या कमी वयात असा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अनेक तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. पोलीस मात्र सर्व अंगांनी तपास करत असून, घटनास्थळाचा पंचनामा आणि मोबाइल तपासणीसह इतर पुरावे गोळा करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.