गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त, जळगावमध्ये पोलिसांची कारवाई

जळगाव वार्ता: जळगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शहरात गावठी कट्ट्यासह  एका तरुणाला जेरबंद करण्यात आलं आहे. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. अयोध्यानगर परिसरात ही घटना घडली आहे. गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे व इलेक्ट्रिक मोपेडसह आरोपीला ताब्यात घेतलं आहे. अभिषेक संजय हवलदार, असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 1.22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

एकूण सुमारे 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात गावठी कट्टा बाळगून दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली. अभिषेक संजय हवलदार असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि बजाज चेतक इलेक्ट्रिक मोपेड असा एकूण सुमारे 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Comments are closed.