एशियाटिकच्या दालनांना भेट देण्याची तरुणाईला संधी
मुंबईकरांच्या आकर्षणाचा विषय असलेल्या एशियाटिक सोसायटीच्या दालनांना भेट देण्याची संधी आता तरुण-तरुणींना मिळणार आहे. एशियाटिक सोसायटीतर्फे ’नो युवर एशियाटिक’ हा नवा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोसायटीचे उपाध्यक्ष आणि अभिनेते डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या व्याख्यानाने हा उपक्रम सुरू होणार आहे. या उपक्रमांतर्गत 15 ते 30 वयोगटातील तरुणांना संस्थेचा इतिहास, ग्रंथसंपदा, दुर्मिळ दस्तावेज आणि वस्तू-संग्रह यांचा विनाशुल्क परिचय व्हावा यासाठी मार्गदर्शकासह एशियाटिकच्या दालनांना भेट देण्याची संधी उपलब्ध मिळणार आहे. एशियाटिक सोसायटीच्या पायऱयांवर येऊन सेल्फी घेणाऱया युवकांना इमारतीच्या विविध दालनांना भेट देऊन आपल्या ऐतिहासिक वारशाची सखोल जाणीव करून घेता येईल, असे उपक्रमाच्या संचालक डॉ. प्राची मोघे यांनी सांगितले. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी दुपारी 3.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
Comments are closed.