युझवेंद्र चहलने रचला इतिहास! टी20 मध्ये केला 400 विकेट्सचा टप्पा पार, टॉप-5 मध्ये भुवनेश्वर आणि बुमराह

भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे, ज्यामध्ये भारतीय संघातील अनेक अनुभवी खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. मुंबई संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने लागोपाठ दोन सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावली. दुसरीकडे युझवेंद्र चहलने मोठा विक्रम नोंदवला, जो आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमला नाही.

चहल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत हरियाणा संघाचे प्रतिनिधित्व करतो. नुकतेच त्याने तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात ४ षटकांत १६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हा सामना हरियाणाने ७ विकेट्सने जिंकला. याबरोबरच चहलने टी२० क्रिकेटमध्ये ४०० विकेट्सचा टप्पा गाठला.

चहल टी२० क्रिकेटमध्ये ४०० विकेट्सचा टप्पा गाठणारा पहिलाच भारतीय ठरला. तो खूप मोठ्या कालावधीपासून भारताच्या टी२० राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. त्याने निळ्या जर्सीच शेवटचा टी२० सामना २०१३ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने आयपीएल आणि इतर देशांतर्गत टी२० स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी सुरूच ठेवली आहे.

टी२० क्रिकेटमध्ये चहलने आतापर्यंत ३४६ सामन्यांमध्ये ४०२ विकेट्स घेतल्या. या यादीत भुवनेश्वर कुमार ३६६ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर, तर जसप्रीत बुमराह ३५४ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच पियुष चावला (३२९) आणि आर अश्विन (३२३) हे पण पहिल्या पाचमध्ये आहेत.

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
४०२ – युझवेंद्र चहल
३६६ – भुवनेश्वर कुमार
354 – जसप्रीत बुमराह
३२९ – पियुष चावला
३२३ – आर अश्विन
३०० – अक्षर पटेल
२९४ – अर्शदीप सिंग

(युजवेंद्र चहलने रचला इतिहास! T20 मध्ये 400 बळींचा टप्पा पार; भुवनेश्वर कुमार जसप्रीत बुमराह देखील टॉप 5 मध्ये)

Comments are closed.