IND vs NZ Test – डीआरएसवरून मैदानात ड्रामा; ग्लेन फिलिप्सला नाबाद दिल्याने गिल पंचांशी भिडला, नक्की काय घडलं?
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिल आणि मैदानावरील पंच यांच्यात डीआरएस निर्णयावरून शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. ग्लेन फिलिप्स याला नाबाद ठरवण्यात आल्याने गिल चांगलाच नाराज झाला. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या सत्रामध्ये जसप्रीत बुमराह याच्या षटकामध्ये हा प्रकार घडला.
😤 कॅप्टनला हवे आहे उत्तरे!
शुभमन गिल तो क्षण शांतपणे जाऊ देत नाहीये! भारताचा कर्णधार मध्यभागी आपली बाजू मांडतो म्हणून अंपायरशी जोरदार चर्चा.
उत्कटता दिसून येते. 👀🔥
#शुबमनगिल #NZvIND #3rdManView https://t.co/KI7yCv5Bfo
— थर्ड मॅन व्ह्यू (@3rdManView) 19 नोव्हेंबर 2026
Comments are closed.