राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 16 टक्के इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे. राज्य बँकेच्या मुख्यालयात यासंदर्भातील ऐतिहासिक करार करण्यात आला. या करारामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 15,500 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

नवा वेतन करार 2026 ते 2031 या कालावधीसाठी असून कर्मचाऱयांना पगारवाढीबरोबरच अन्य सुविधाही देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांसाठी सुरक्षा कवच योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सेवा काळात मृत झालेल्या कर्मचाऱयाच्या उर्वरित सेवेच्या प्रत्येक वर्षातील दोन महिन्यांचा पगार त्याच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. वेतन कराराच्या वेळी राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्यासह बँकेतील सर्व सहा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments are closed.