शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना कांजूर शाखा क्र. 117 च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी शाखाप्रमुख इंद्रजित प्रभू-गवस आणि श्री साईबाबा ट्रस्ट यांनी कांजूरच्या नवमहाराष्ट्र व्यायामशाळा येथे या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 172 रक्तदात्यांनी रक्तदान करत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नगरसेविका श्वेता पावसकर, नगरसेवक दीपक सावंत, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, अप्पा राऊत, सिद्धी जाधव, राजू माने, संतोष कडू, दीपक पाटील, अरुण सावंत, सखाराम देसाई उपस्थित होते.

Comments are closed.