मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा म्हणजे जणू… अंबादास दानवे यांची जळजळीत टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुष्काळी भागाचा दौरा केला. मराठवाड्यातील लातूर, धाराशीव तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्ऱ्यांचा या पाहणी दौऱ्यावर शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. ”मुख्यमंत्ऱ्यांचा हा दौरा म्हणजे जणू ‘मेरी आवाज सुनो’ हा चित्रपटच होता”, असा टोला त्यांनी सोशल मीडियावरून लगावला.

”मुख्यमंत्री फडणवीस यांचा कालचा मराठवाडा दौरा म्हणजे जणू ‘मेरी आवाज सुनो’ हा चित्रपटच होता! शेतकऱ्यांचा आवाज ऐकायचा नाही आणि आपलंच कीर्तन रेटायचं, अशी या चित्रपटातील नायकाची कथा होती. ताफ्यातील एक आघाडीचा व्हिलन शेतकऱ्यांना धक्के मारून लोटत सुटला होता; तर दुसऱ्या एकाला हे पाहून दया येत असली, तरी तो दात काढलेल्या वाघासारखा अपमान गिळून मुकाट उभा होता. ​या चित्रपटात लोकांना मंत्रालयात चक्रव्यूह रचणारा ‘अभिमन्यू’ही दिसला आणि तलवार काढून घेतलेला ‘सरनाईक’ही अधूनमधून झळकताना पाहता आला. ​पण चित्रपटातून एक मुख्य डायलॉग मात्र गायब होता. “मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ बघितला, पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही!”, असा सणसणीत टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Comments are closed.