ताडोबातील रिसॉर्ट मालकाने जीवन संपवले
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा परिसरात ‘जंगल मेडो’ रिसॉर्टचे संचालक कुणाल जयंत पटेल (४२) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने ताडोबाच्या पर्यटन क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, त्यांच्या परिचितांमध्ये आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पटेल यांनी गेल्या १५ वर्षांपासून कोलारा परिसरात ‘जंगल मेडो’ रिसॉर्टच्या माध्यमातून त्यांनी ताडोबा पर्यटन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. वन्यजीव, विशेषतः ताडोबातील वाघ आणि निसर्ग यांचे छायाचित्रण करण्यात त्यांना विशेष रस होता. त्यामुळे पर्यटक, वन्यजीवप्रेमी आणि छायाचित्रकारांमध्येही ते परिचित होते. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर कोलारा परिसरात एकच खळबळ उडाली. नेमक्या कोणत्या कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तपासातून आत्महत्येचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.