विजयच्या पत्नीने घटस्फोटाची याचिका मागे घेतली.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय थलपथी आणि त्यांची पत्नी संगीता यांच्यातील घटस्फोटाचे प्रकरण आता मिटल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. पत्नी संगीताने तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याचे वृत्त आहे. संगीताने याचिका मागे घेतल्याने न्यायालयाने हे प्रकरण आता बंद केले आहे.
विजय थलपथी आणि संगीता सोरनालिंगम यांचा विवाह 1999 मध्ये झाला होता. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. तथापि, मध्यंतरी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे वृत्त होते. डिसेंबर 2025 मध्ये पत्नी संगीताने चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात विजयपासून घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. नंतर हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात वर्ग करण्यात आले. त्याठिकाणी घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. तथापि, आता संगीताने याचिका मागे घेतल्याने हे प्रकरण संपुष्टात आले आहे.
Comments are closed.