नोकरी, शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलांसाठी Hostel चांगलं की PG?

उच्च शिक्षण आणि नोकरीच्या शोधात दरवर्षी लाखो तरुण-तरुणी आपली गावे सोडून मोठ्या शहरांमध्ये येतात. नव्या शहरात पाऊल ठेवताच त्यांच्यासमोर पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे राहायचं कुठे? आपल्या मुलांना सुरक्षित राहावं यासाठी साधारपणे शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांसाठी होस्टलचा पर्याय निवडतात. तर नोकरी करणारे पिजीचा पर्याय. या दोन्ही पर्यायांचे स्वतःचे असे काही फायदे आणि तोटे आहेत. तुमच्यासाठी नेमका कोणता पर्याय योग्य आहे आणि पालकांनी काय काळजी घ्यायला हवी चला जाणून घेऊयात. hostel or pg which is better

होस्टेल म्हणजे काय?

शैक्षणिक संस्थाकडून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली निवासी सुविधा म्हणजे होस्टेल. इथे मुलांसाठी कठोर नियम असतात. बहुतेकवेळा हॉस्टेल कॉलेजच्या आवारातच किंवा जवळच असते. त्यामुळे मुलांचा प्रवासाचा खर्च वाचतो. हॉस्टेलमध्ये फीमध्ये भोजन, वीज, इंटरनेट, पाणी या सुविधा समाविष्ट असतात.

फायदे –

  • हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक आणि वॉर्डन असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा पर्याय उत्तम असतो.
  • खाजगी हॉस्टेल किंवा सरकारी हॉस्टेलचा खर्च पीजीच्या तुलनेत बराच कमी असतो.
  • येथे एकाच वयोगटातील मुले एकत्र राहत असल्याने अभ्यासाचे वातावरण मिळते.

तोटे –

  • काही हॉस्टेलमध्ये खूप कडक नियम असतात. ठराविक वेळेतच हॉस्टेलमध्ये यावं लागतं, बाहेरच्यांना आत यायची परवानगी नसते.
  • बहुतांश वेळा खोली शेअर करावी लागते, त्यामुळे प्रायव्हसी कमी होते.
  • काही हॉस्टेल्समध्ये खोल्याही लहान असतात आणि AC किंवा खासगी बाथरूमसारख्या सुविधा नसतात.

PG म्हणजे काय?

PG म्हणजे Paying Guest. PG ही अशी व्यवस्था असते जिथे विद्यार्थी किंवा नोकरी करणारे दुसऱ्याच्या घरी किंवा खासगी इमारतीत भाड्याने राहतात आणि त्यासाठी ते दरमहा ठराविक भाडं देतात.

फायदे –

पीजीमध्ये वेळेचं बंधन नसते. ज्यामुळे नाईट शिफ्ट करणाऱ्यांसाठी हा पर्याय सोयीचा ठरतो.

बहुतांश पीजीमध्ये वाय-फाय, गिझर, वॉशिंग मशीन आणि कधीकधी स्वतः स्वयंपाक करण्याची सोय असते.

तोटे –

हॉस्टेलच्या तुलनेत पीजीचा खर्च खूप जास्त असतो. तसेच अनेक ठिकाणी सुरक्षिततेची जबाबदारी स्वतःवरच असते. त्यामुळे PG निवडताना विचार करून, तपासूनचं निवडावं.

योग्य काय?

  • प्रथमच घराबाहेर जाणाऱ्या मुलांसाठी हॉस्टेल योग्य पर्याय ठरू शकतो.
  • स्वावलंबी व मोकळेपणाची आवड असणाऱ्या मुलांसाठी PG देखील चांगला पर्याय असू शकतो.
  • घरमालकाची पार्श्वभूमी, सुरक्षा व्यवस्था, कॉलेजपासून अंतर किती आहे हे PG राहताना तपासेवे.

हेही वाचा – ‘घर’ जेव्हा सुरक्षित वाटेनासं होतं…तेव्हा महिलांच्या मनात नेमकं काय घडतं?

Comments are closed.