सकाळी उठल्यावर चेहरा सुजलेला दिसतो?





दररोज सकाळी झोपून उठल्यानंतर जर तुमचा चेहरा सुजलेला दिसत असेल तर कमी झोप किंवा थकव्यामुळे असे झाले असेल असा विचार करू नका. कारण जर ही समस्या तुम्हाला दररोज भेडसावत असेल तर हे किडनीचा विकाराचेही लक्षण असू शकते.

शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम किडनी करते. मात्र ज्यावेळी किडनीच्या कामात बिघाड होतो तेव्हा शरीरात पाणी जमा होतं. त्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसतात. यात डोळ्याखाली सूज दिसते. पण प्रत्येकवेळी चेहरा सूजण्याचे कारण किडनीत बिघाड असे नसते. तर एलर्जी, आहारात जास्तीचे मीठ, शरीरातील हार्मोनल बदल ,अपुरी झोप , थायरॉईड ही देखील याची कारण असू शकतात. तर कधी कधी औषधांचा हा परिणामही असू शकतो.

यामुळे चेहऱ्याबरोबरच जर पायाला सूज,लघवीत फेस, हाय ब्लड प्रेशर,भूक मंदावणे, थकवा, मळमळ, दम लागणे ही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किडनी सुदृढ ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यावे. ब्लड शुगर, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील याची काळजी घ्यावी.धूम्रपान आणि मद्यसेवनापासून दूर राहावे. नियमित व्यायाम करावा.



Comments are closed.