Deep Amavasya 2026 : दीप अमावस्येला दीपपूजन कसे करावे?




Deep Amavasya 2026


आषाढ अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे. आषाढ महिन्याचा शेवट या तिथीने होतो आणि यानंतरच श्रावणाला सुरूवात होते. या दिवशी दीपपूजन करणे शुभ असते. देशात अनेक ठिकाणी घरातील दिवे, समई आणि दीप स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची देखील पद्धत आहे. अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत, महत्त्व सर्वकाही जाणून घ्या या लेखातून,

तारीख

12 ऑगस्ट 2026 बुधवार
प्रारंभ – 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1.52 वाजल्यापासून
समाप्त – 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.06 मिनिटांनी
दीपपूजन – 12 ऑगस्ट

दीपपूजन कसे करावे?

  • सकाळी किंवा संध्याकाळी घर स्वच्छ करून देवघरही स्वच्छ करून घ्यावे.
  • यानंतर घरातील दिवे, समई आदी गोष्टी स्वच्छ कराव्यात.
  • भाताबरोबर सुंदर आसन बनवा.
  • पूजेसाठी दिवे एका पाटावर ठेवावेत.
  • त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत.
  • दिव्यात तेल घालून वात लावावी.
  • त्यानंतर दिवे प्रज्वलित करून देवतांचे स्मरण करावे,
  • या दिवशी विशेषतः संध्याकाळी दीप लावून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही एक दिवा ठेवण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. मात्र दिवा कुठे आणि किती लावायचा याबाबत
  • कुटुंबपरंपरा आणि स्थानिक प्रथा वेगवेगळ्या असू शकतात.

हेही वाचा – Aarti Significance : आरतीनंतर अग्नि वरून हात फिरवून डोळ्यांना का लावतात?



Comments are closed.