समुद्राच्या तळाशी असणार आता निपुणची नजर, 300 मीटर खोलीपर्यंत करणार धडाकेबाज मोहिमा





नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय सीमासुरक्षांमध्ये अनेक मोठे बदल आणि नवनवीन सुरक्षा-संसाधने पाहायला मिळाली आहेत. अशामध्ये आता भारतीय नौदलाची समुद्रामधली ताकद आता आणखी वाढणार आहे. सोमवारी (31 ऑगस्ट) भारतीय नौदलात मुंबईच्या नवल डॉकयार्ड येथे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेले ‘आयएनएस निपुण’ (INS Nipun) हे डायव्हिंग सपोर्ट व्हेसेल (DSV) अधिकृतपणे दाखल झाले आहे. नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात INS निपुणचे नौदलात कमिशनिंग करण्यात आले. या जहाजामुळे पश्चिम नौदल कमांडला खोल समुद्रातील बचाव तसेच डाइव्हिंग मोहिमांसाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – दीपक साळवी)



Comments are closed.