सकाळी उठल्यावर लगेच करू नका या 5 गोष्टी
सकाळची सुरुवात कशी होते याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसाच्या रुटीनवर जाणवू शकतो. अनेकांची सकाळ अलार्म बंद करण्यापासून सुरू होते आणि त्यानंतर हातात येतो तो थेट मोबाइल. तर काहीजण घाईघाईत नाश्ता टाळतात किंवा उठल्या उठल्या कॉफीचा कप घेतात. या छोट्या सवयी रोजच्या रुटीनचा भाग झाल्या असतील तर त्यात थोडा बदल करण्याचा प्रयत्न करा.
1) उठल्या उठल्या मोबाइल पाहू नका
अलार्म बंद केल्यानंतर लगेच सोशल मीडिया, मेसेज किंवा ई-मेल पाहण्याची सवय टाळा. काही मिनिटे स्वतःला आणि सकाळच्या रुटीनला द्या.
2) बेडवरच पडून राहू नका
अलार्म बंद करून पुन्हा झोपण्याऐवजी हळूहळू उठा. पडदे उघडा, खोलीत प्रकाश येऊ द्या आणि दिवसाची सुरुवात करा.
3) उठताच चहा / कॉफी टाळणे
सकाळी उठल्यावर लगेच मोठा कप चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी आधी पाणी पिण्याची सवय लावा. कॅफीनचे प्रमाणही आपल्या गरजेनुसार ठेवा.
४) नाश्ता टाळणे
सकाळच्या धावपळीत नाश्ता स्किप करण्याची सवय लागू देऊ नका. वेळ कमी असेल तर साधा आणि पौष्टिक नाश्ता निवडा.
5) कामाचा ताण
डोळे उघडताच ऑफिसचे मेल, कामांची मोठी यादी किंवा दिवसभराच्या तणावाचा विचार सुरू करू नका. काही मिनिटे शांत राहून दिवसाचे नियोजन करा.
सकाळी छोट्या सवयींमध्ये केलेले बदल संपूर्ण दिवस अधिक व्यवस्थित घालवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे उठल्याबरोबर घाई करण्याऐवजी स्वतःसाठी काही मिनिटे राखून ठेवा
Comments are closed.