हिप्स फॅट कमी करण्यासाठी 5 मिनिटांचा वर्कआउट
हिप्सवर फॅट जमा होण्यामागे शरीराची रचना, आनुवंशिकता, आहार आणि दैनंदिन हालचाली अशा अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. हिप्सचा भाग अधिक मजबूत आणि टोन करण्यासाठी नियमित व्यायामासोबत सक्रिय जीवनशैली महत्त्वाची आहे. यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. घरच्या घरी फक्त 5 मिनिटे देऊन हे सोपे व्यायाम करून पाहू शकता.
स्क्वॅट्स
पाय खांद्याच्या रुंदीइतके अंतर ठेवून सरळ उभे राहा. आता खुर्चीवर बसल्याप्रमाणे हळूहळू खाली बसा आणि पुन्हा वर या. असे 10 ते 15 स्क्वॅट्स करा. हा व्यायाम हिप्स, मांड्या आणि पायांच्या स्नायूंना मजबूत करण्यास मदत करतो.
ग्लूट ब्रिज
पाठीवर झोपा आणि दोन्ही गुडघे वाकवा. पाय जमिनीवर ठेवा. आता हिप्स हळूहळू वर उचला, काही सेकंद थांबा आणि पुन्हा खाली आणा. असे 12 ते 15 वेळा करा.
रिव्हर्स लंज
सरळ उभे राहून एक पाय मागे घ्या आणि गुडघे वाकवत शरीर खाली आणा. पुन्हा सुरुवातीच्या स्थितीत या आणि दुसऱ्या पायाने हीच कृती करा. प्रत्येक पायाने 8 ते 10 वेळा करा.
5 मिनिटांचे रुटीन
सुरुवातीला 1 मिनिट हलका वॉर्मअप करा. त्यानंतर स्क्वॅट्स, ग्लूट ब्रिज आणि रिव्हर्स लंज प्रत्येकी साधारण 1 मिनिट करा. शेवटचे 1-2 मिनिटे हलके स्ट्रेचिंग करा.
केवळ हिप्सवरील फॅट एका व्यायामाने कमी होईलच असे नाही. संपूर्ण शरीराची हालचाल, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सातत्यपूर्ण व्यायाम यामुळे शरीरातील फॅट कमी करण्यास मदत होऊ शकते.
Comments are closed.