ऑफिसच्या गोष्टी घरी सांगण्याचे बरे वाईट परिणाम

सध्या सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा वाढत आहेत. यामुळे साहजिकच स्वत:ला सिद्ध करताना प्रत्येकाला ताण तणावाचा सामना करावा लागतो. अशावेळी मनावरचा ताण कमी व्हावा या भावनेतून अनेकजण ऑफिसमधल्या लहान सहान गोष्टीदेखील कुटुंबियांबरोबर शेअर करतात. पण असे करणे खरंच योग्य आहे का? कारण प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यात बरेच अंतर असते. यामुळे आपले प्रोफेशल प्रॉब्लेम घरच्यांशी किंवा मित्र मंडळीबरोबर शे्अर करताना सीमारेषा ठेवणं गरजेचे आहे.

तज्ज्ञानुसार जसे तुमच्या घरातील प्रश्न फक्त तुम्हीच सोडवू शकता कारण त्याचे मूळ फक्त तुम्हालाच माहीत असते. तसेच तुमच्या ऑफिसमधील प्रश्नही तुम्ही व तुमची टिमच सोडवू शकते. घरातील मंडळी यात प्रोफेशनलपेक्षा पर्सनल विचारांना अधिक प्राधान्य देण्याची शक्यता असते. जसे की तुम्ही एखाद्या सहकाऱ्याबद्दल रागाच्या भरात सांगितलेली गोष्ट घरच्यांच्या मनात कायम राहू शकते. कारण ते फक्त तुम्हाला होणाऱ्या त्रासाचा विचार करतात. तुम्ही सांगितलेल्या परिस्थितीवरून ते मनात आराखडे बांधतात आणि फक्त तुमचा विचार करून तुम्हाला सल्ला देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सांगितलेल्या ऑफिसमधील व्यक्तींबद्दल, बॉस, सहकाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात नकारात्मक मत तयार होऊ शकतं. त्यामुळे ऑफिसच्या गोष्टी घरी सांगताना सीमारेषा आखावी. प्रत्येक गोष्ट सांगणे आवश्यक नाही. कोणती माहिती, किती आणि कोणाला सांगायची याची सीमा ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचे बरे वाईट असे दोन्ही परिणाम आहेत जे तुमच्या दैनंदिन आयुष्यावरही होऊ शकतात. “भावना घरच्यांशी शेअर कराव्यात; पण ऑफिसची गोपनीय माहिती आणि व्यक्तींची खासगी माहिती शेअर करू नये.”हा प्रत्येक प्रोफेशनचा नियम आहे तो पाळावा

ऑफिसमधील गोष्टी घरच्यांना सांगण्याचे फायदे

मन मोकळे होते – ऑफिसमधील ताण, चिंता किंवा एखादी अडचण जवळच्या व्यक्तीशी बोलल्याने मन हलके होते.
भावनिक आधार मिळतो – कठीण प्रसंगी कुटुंबाचा सल्ला आणि पाठिंबा मिळू शकतो.
काम-जीवन संतुलन राखण्यास मदत – दिवसभरातील अनुभव शेअर केल्याने ऑफिसचा ताण घरी साठून राहत नाही.
गैरसमज कमी होतात – ऑफिसमधील ताणामुळे आपला मूड बदलला असेल तर त्याचे कारण कुटुंबाला समजू शकते.
चांगल्या अनुभवांची देवाणघेवाण – यश, कौतुक किंवा नवीन संधी याबद्दल सांगितल्याने कुटुंबालाही आनंद होतो.

तोटे काय होऊ शकतात?

ऑफिसमधील व्यक्तींबद्दल नकारात्मक मत तयार होऊ शकते – आपण एखाद्या सहकाऱ्याबद्दल रागाच्या भरात सांगितलेली गोष्ट घरच्यांच्या मनात कायम राहू शकते.
गोपनीयता धोक्यात येऊ शकते – कंपनीची रणनीती, ग्राहकांची माहिती, पगार किंवा अंतर्गत निर्णय शेअर करणे अयोग्य ठरू शकते.
ऑफिसचा ताण घरीही येतो – सतत ऑफिसच्या समस्या बोलल्याने घरातील वातावरणही तणावपूर्ण होऊ शकते.
भावनेच्या भरात चुकीचा सल्ला मिळू शकतो – घरच्यांना पूर्ण परिस्थिती माहीत नसल्यामुळे त्यांचा सल्ला अपूर्ण माहितीवर आधारित असू शकतो.
नातेसंबंधांवर परिणाम – सहकाऱ्यांशी नंतर संबंध सुधारले तरी घरच्यांच्या मनातील नकारात्मक भावना तशाच राहू शकतात.

काय सांगावे आणि काय टाळावे?

कामाचा सामान्य ताण
स्वतःच्या भावना
करिअरच्या संधी
ऑफिसमधील चांगले अनुभव
स्वतःला भेडसावणाऱ्या अडचणी

काय सांगणं टाळावे ?

कंपनीची गोपनीय माहिती
सहकाऱ्यांची वैयक्तिक माहिती
पासवर्ड, आर्थिक/व्यावसायिक संवेदनशील माहिती
रागाच्या भरात कोणाबद्दल केलेली गंभीर टीका
अपूर्ण माहितीवर आधारित ऑफिसमधील अफवा

Comments are closed.