पस्तीशीनंतर महिलांचे वजन आणि पोट का वाढते?

महिलांनी साधारणपणे वयाची पस्तिशी ओलांडली की अनेक महिलांमध्ये पोटाचा घेर वाढणे आणि वजन वाढणे या सामान्य समस्या दिसून येतात. विशेष म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये फारसा बदल झालेला नसतानाही शरीर अचानक बदलू लागते. तज्ज्ञांच्या मते पस्तीशीनंतर महिलांचे वजन वाढण्यामागे दोन मोठी कारणे जबाबदार असतात. कोणती आहेत ही कारणे जाणून घेऊयात.

ताण

मानसिक किंवा शारीरिक स्ट्रेस वाढल्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल हे स्ट्रेस हार्मोन वाढते. कॉर्टिसॉल वाढल्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे कार्य बिघडते आणि जास्त गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. यामुळे फॅट्स शरीरात जमा होऊन पोटाभोवती चरबी साचू लागते. तसेच ताणतणावामुळे झोपेचे चक्र बिघडते आणि अपुऱ्या झोपेमुळेही वजन वेगाने वाढू लागते.

हार्मोन्समध्ये बदल

या वयात किंवा त्यानंतर महिलांमध्ये बाळंतपण, स्तनपान किंवा पेरिमेनोपॉज यांसारख्या विविध शारीरिक टप्प्यांमुळे हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समधील चढ-उतार पचनक्रिया मंदावतात आणि शरीरावर फॅट्स साचण्यास कारणीभूत ठरतात.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय

नियमित व्यायाम

दररोज किमान 30 मिनिटे वेगाने चालणे, योगासने किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करावे.

ताणतणावाचे व्यवस्थापन

मेडिटेशन, प्राणायाम आणि आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढून स्ट्रेस कमी ठेवता येईल.

योग्य आहार आणि पुरेशी झोप

आहारात फायबर व प्रथिनांचा समावेश करावा आणि दररोज 7 ते 8 तासांची शांत झोप घ्यावी.

हेही वाचा – वारंवार ढेकर येण्यामागे असू शकतात ही कारणे

Comments are closed.