कामाच्या वेळी भूक लागतेय? ऑफिस डेस्कवर आवर्जून ठेवा हे पौष्टिक पदार्थ

ऑफिसमध्ये काम करताना अचानक लागणारी भूक भागवण्यासाठी आणि जंक फूड टाळण्यासाठी ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवता येण्यासारख्या काही पौष्टिक पदार्थांची माहिती जाणून घेऊयात.

भाजलेले चणे – हे साठवणे सोपे असून चवीसाठी त्यावर थोडेसे सैंधव मीठ किंवा चाट मसाला टाकता येतो.
मखाणे – कुरकुरीत आणि हलके खाणे खाण्याची इच्छा झाल्यावर खाण्यासाठी उत्तम पर्याय.
नट्स – बदाम, अक्रोड आणि काजू अल्प प्रमाणात खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते.
भाजलेल्या बिया -भोपळ्याच्या किंवा सूर्यफुलाच्या बिया हलक्या परतून छोट्या डब्यात ठेवता येतात.
खाकरा -संध्याकाळच्या वेळेस कुरकुरीत खाण्याची क्रेव्हिंग शांत करण्यासाठी उत्तम.
पॉपकॉर्न – कमी तेल व साखर वापरून तयार केलेले पॉपकॉर्न हवाबंद डब्यात ठेवता येतात.

हे पदार्थ मोठ्या पॅकेटऐवजी लहान डब्यांमध्ये किंवा पार्सलमध्ये ठेवावेत, जेणेकरून एकाच वेळी जास्त खाणे टाळता येईल.

हेही वाचा – इनडोअर प्लांट्स सुकतात, पानं पिवळी पडतात?

Comments are closed.