फक्त वीकेंडला जिममध्ये घाम गाळताय? ठरू शकतं घातक
आठवडाभर कामाच्या, रोजच्या रुटीनमध्ये जिममध्ये जाणं शक्य होत नाही, म्हणून अनेकजण केवळ शनिवार आणि रविवारी जिमला जातात आणि तासनतास हेवी वर्कआउट करतात. तुम्हालाही अशी सवय असेल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही वीकेंड वॉरियर पद्धत शरीरासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी घातक ठरू शकते.
सलग पाच दिवस विश्रांती घेऊन अचानक वीकेंडला अतिव्यायाम केल्याने स्नायूंवर प्रचंड ताण येतो. यामुळे स्नायू दुखापत, सांधेदुखी आणि शरीरातील हाडांवर अतिरिक्त दाब पडतो. याशिवाय, अचानक हृदयाच्या गतीवर येणाऱ्या ताणामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो.
फिटनेस तज्ज्ञांच्या मते, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी केवळ वीकेंडला व्यायाम करून चालत नाही. व्यायामामध्ये सातत्य असणं अत्यंत गरजेचं आहे. जर आठवडाभर जड वर्कआउटसाठी वेळ मिळत नसेल, तर चालणे, योगासने किंवा हलका स्ट्रेचिंगचा पर्याय निवडावा.
तज्ज्ञांचा सल्ला –
सातत्य ठेवा
आठवड्यातून किमान 3 ते 4 दिवस नियमितपणे 30 ते 40 मिनिटे व्यायाम करावा.
हेवी वेट उचलू नये
वीकेंडला जिममध्ये गेल्यास वॉर्म-अप न करता थेट जड वजन उचलणे टाळावे.
विश्रांती
शरीराला पुरेशी विश्रांती आणि योग्य आहार देणे फिटनेसचा अविभाज्य भाग आहे.
आठवडाभर आळसात राहून वीकेंडला एकाच दिवसात शरीराकडून अतिव्यायाम करून घेण्याची सवय तब्बेत सुधारण्याऐवजी ती बिघडवू शकते.
हेही वाचा – विकेंडला जास्त झोपता? मग ‘हे’ गणित जाणून घ्या
Comments are closed.