शरीरावरील सूज कमी करणारे पेय
आजच्या बिझी लाईफस्टाईलमुळे खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, अपुरी झोप यासह अनेक शारिरीक मानसिक समस्यांनी सगळेच हैराण झाले आहेत. यात प्रामुख्याने शरीरावर येणारी सूज म्हणजेच इंफ्लेमेशन सारख्या समस्या तरुणांसह वयस्क व्यक्तींमध्ये दिसू लागल्या आहेत. पण शरीरावर ही सूज दिर्घकाळ राहील्यास त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने वेळीच काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी रुग्णांना देतात. अशावेळी शरीरावरील ही सूज घालवण्यासाठी काय करावे ते बघूया.
आलं
आल्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते. त्यासाठी दररोज एक कप पाण्यात आल्याचे काही तुकडे टाकून ते पाणी उकळावे. हे पाणी प्यायल्याने शरीरावरची सूज निश्चित कमी होते.
हिरवा चहा
ग्रीन टी शरीरातील ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करण्यास उपयोगी आहे. त्यामुळे शरीरावरील सूज कंट्रोल करता येते. त्यामुळे नियमित ग्रीन टीचे योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते.
आवळा
व्हिटामीन सीने युक्त असलेला आवळा शरीरातील ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करतो. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. त्यासाठी आवळा मिक्सरमध्ये काढून त्याचा ज्यूस बनवावा. त्याचे सेवन करावे.
चिया बियाणे
चिया सीड्स मध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फायबर आणि अँटीऑक्सीडेंट गुण असतात.यामुळे शरीराला पोषक तत्व मिळतात. सूज कमी होते.
Comments are closed.