जुन्या बेडशीट फेकू नका, असा करा कल्पक वापर
वापरून जुन्या झालेल्या किंवा फाटलेल्या बेडशीट बहुतांश वेळा फेकून दिल्या जातात किंवा खराब कपड्यांमध्ये पडून राहतात. मात्र, थोडीशी कल्पककता दाखवल्यास या जुन्या बेडशीटचा पुनर्वापर करून अनेक उपयोगी वस्तू बनवता येऊ शकतात. यामुळे घरातील कचरा तर कमी होतोच, शिवाय पैशांचीही बचत होते.
- जुनी कॉटन बेडशीट पायपुसणी तयार करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. बेडशीटचे लांब तुकडे कापून त्याची वेणी विणून तुम्ही आकर्षक आणि टिकऊ पायपुसणी बनवू शकता.
- कपाटातील किंवा सुटकेसमधील कपडे धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या कपड्यापासून कव्हर किंवा साड्यांच्या पिशव्या शिवणे उत्तम पुनर्वापर ठरेल.
- लहान मुलांच्या चित्रकलेसाठी किंवा खेळासाठी कॅनव्हास म्हणून जुने कपडे कामी येऊ शकते.
- जुनी फर्निचर, सोफा किंवा महागड्या वस्तू दीर्घकाळ वापरत नसल्यास झाकून ठेवण्यासाठी डस्ट कव्हर म्हणून याचा सहज वापर होतो.
- जर कापडाची गुणवत्ता चांगली असेल तर कुशन कव्हर्स, टेबल रनर्स किंवा सुती पिशव्या शिवता येतील.
हेही वाचा – Winter Foot Care: हिवाळ्यात टाचांना भेगा पडतात? पायांची अशी घ्या काळजी
Comments are closed.