राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 2.50 टक्के वाढ

त. भा. प्रतिनिधी / बेंगळूर :

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने दिवाळी भेट दिली असून महागाई भत्त्यात (डीए) 2.50 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. हा सुधारित महागाई भत्ता 1 जुलै 2026 पासून लागू होईल याप्रमाणे जारी करण्यात आला आहे. संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर, अधिकृत सरकारी आदेश गुरुवारी जारी होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर, कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांनी संघटनेच्या वतीने राज्य सरकार आणि संबंधित मंत्र्यांचे आभार मानले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Comments are closed.