IND vs SL: सलग 22 रिव्ह्यू फेल! या भारतीय गोलंदाजाचं अनोखं दुर्दैव, नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

डीआरएस म्हणजेच रिव्ह्यू (Review) घेण्याच्या बाबतीत एखादा गोलंदाज किती दुर्दैवी असू शकतो? यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की कोणाचे एक, दोन किंवा जास्तीत जास्त तीन रिव्ह्यू फेल होऊ शकतात, तर हा आकडा थेट 22 वर पोहोचला आहे. एका भारतीय स्टार गोलंदाजाचे सलग 22 रिव्ह्यू फेल ठरले आहेत आणि हा दिग्गज दुसरा तिसरा कोणी नसून स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आहे.
भारतीय संघ सध्या कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी (2nd Test match between IND vs SL) सामना खेळत आहे. या सामन्यात जडेजाने गोलंदाजी करताना श्रीलंकेचा फलंदाज केषरा नुवांताविरुद्ध बाद (Wicket) होण्यासाठी अपील केले, ज्याला पंचांनी फेटाळून लावले. त्यानंतर भारतीय कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) एलबीडब्ल्यू (LBW) साठी रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायर्सनी तपासणी केली असता, चेंडू पॅडला लागण्यापूर्वी तो बॅटला लागल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. अशा प्रकारे भारताचा रिव्ह्यू वाया गेला आणि जड्डू पुन्हा एकदा डीआरएसमध्ये अपयशी ठरला.
गेल्या तीन वर्षांत कसोटी सामन्यांमध्ये जडेजामुळे घेतलेले सलग 22 रिव्ह्यू अपयशी ठरले आहेत. यामध्ये 18 वेळा थेट रिव्ह्यू पूर्णपणे वाया गेला, तर 4 वेळा असे घडले की निर्णय ‘अंपायर्स कॉल’ (पंचांचा निर्णय कायम) राहिला. यामध्ये संघाचा रिव्ह्यू तर वाचला, पण जडेच्या गोलंदाजीवर पंचांचा निर्णय बदलता आला नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये जडेजाचा शेवटचा यशस्वी रिव्ह्यू जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होता. त्याला यशस्वी होऊन आता 3 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. शेवटचा रिव्ह्यू यशस्वी झाला तेव्हा जडेजाच्या नावावर कसोटीत 271 विकेट्स होत्या. आता त्याच्या खात्यात 353 विकेट्स जमा झाल्या आहेत. याचा अर्थ, कोणताही यशस्वी रिव्ह्यू न मिळवताही जडेजाने तब्बल 82 विकेट्स घेतल्या आहेत.
रवींद्र जडेजाची कसोटी कारकीर्द पाहायची झाल्यास, जडेजाने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने भारत-श्रीलंका दुसरी कसोटी वगळून खेळले आहेत. या सामन्यांच्या 169 डावांत गोलंदाजी करताना त्याने 25.19 च्या सरासरीने 352 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये एका सामन्यात 10/110 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. याशिवाय कसोटीच्या इतर डावांत फलंदाजी करताना जड्डूने 37.77 च्या सरासरीने धावा केल्या असून, त्याच्या नावावर 6 शतके आणि 28 अर्धशतकांची नोंद आहे.
Comments are closed.