नेपाळमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील 66 पर्यटकांचा संपर्कच नाही! 404 पैकी 338 नागरिक सुरक्षित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कैलास मानसरोवर यात्रा, गिर्यारोहण आणि पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील 404 नागरिक नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अडकले आहेत. त्यापैकी 338 नागरिक सुरक्षित आहेत. मात्र 66 पर्यटकांशी अद्याप संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

142 नागरिक भारतात सुखरूप पोहचले असून रायगडमधील 37 पर्यटक विमानाने मुंबईत पोहचले तर नागपूरमधील 102 जण रेल्वेने नागपूरकडे निघाले आहेत.

महाराष्ट्रातील रिचा टूर्स प्रा. लि. या संस्थेमार्फत गेलेल्या 60 जणांचा अद्याप संपर्क झालेला नाही. इतर 6 नागरिकांची माहिती लिंकद्वारे प्राप्त झाली असून त्यांच्याशी संपर्क साधता आलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाकडून चीन-तिबेट प्रदेशात असलेल्या भारतातील 149 नागरिकांची यादी मिळाली आहे. या यादीतील नागरिक राज्यातील वेगवेगळ्या जिह्यांमधील असल्याने त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पर्यटकांचा संपर्क होऊ न शकल्याने चिंता वाढली आहे.

Comments are closed.