Mumbai crime news – चार कोटींच्या सोन्यावर नोकरानेच मारला डल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मीरा रोड पूर्वेतील ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल 4 किलो 300 ग्रॅम वजनाचे चार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राजस्थानमधील जयपूर येथून नोकरासह दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह इतर मुद्देमाल मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे.

मीरा रोड पूर्वेतील क्विन्स पार्क परिसरातील ‘शगुन ज्वेलर्स’ च्या दुकानात ही खळबळजनक चोरी झाली होती. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुकानाचे मालक राजेश बापना (42) यांनी याबाबत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार दुकानातील विविध कॅरेटचे सोन्याचे हार, मंगळसूत्र, अंगठ्या, कानातील बाली, चेन, पेंडंट, ब्रेसलेट आदी दागिने चोरीला गेले होते.

Comments are closed.