Makeup Mistakes : या चुकांमुळे मेकअप केल्यावर तुम्ही दिसता वयापेक्षा अधिक
दररोज हलका मेकअप करणे प्रत्येक महिला पसंत करते. मेकअप केल्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य तर वाढतेच शिवाय आत्मविश्वासही निर्माण होतो. परंतू कित्येकदा लहान-सहान चुकांमुळे आपण सुंदर दिसण्याऐवजी वयस्कर दिसू लागतो. अनेक महिलांचा चेहरा मेकअप केल्यावर पॅची दिसू लागतो. त्या वयापेक्षा अधिक वयाच्या दिसतात. तुमच्याही बाबतीत असे काही घडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला मेकअपच्या अशा सामान्य चुका सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही वयापेक्षा अधिक दिसता.
कन्सिलरचा अतिवापर –
कित्येकदा महिलांकडून कन्सिलरचा अतिवापर करण्यात येतो. विशेषत: जेव्हा आपण चुकीचा रंग निवडता आणि त्याचा थर परत त्वचेवर लावता तर सुरकुत्या दिसायला लागतात. त्यामुळे कन्सिलरचा अतिवापर टाळावा.
मस्करा –
मस्काऱ्याचा वापर पापण्या काळ्या आणि आकर्षक दिसण्यासाठी केला जातो. मात्र जेव्हा तुम्ही डोळ्यांवर जास्त मस्कारा लावता तेव्हा डोळ्यांखाली सुरकुत्या दिसू लागतात.
लिपस्टिकची चुकीची शेड –
मेकअप केल्यावर अनेकजणी वयस्कर दिसतात यामागे चुकीची लिपस्टिक हे कारण असू शकते. यासाठी तुमचे ओठ लहान पातळ असतील तर डार्क रंगाची लिपस्टिक टाळावी.
आयशॅडो –
संपूर्ण आयलिडवर आयशॅडो कधीही लावू नये, यामुळे वय अधिक दिसते. आयशॅडो फक्त डोळ्यांच्या बाह्य कोपर्यावर लावावे.
इन्कम लाइनर –
डोळ्यांच्या खालील लीडवर लायनरच्या अति वापरामुळे डोळे लहान दिसतात. आयलायनरसाठी आपण लाइट मेकअप पेन्सिल वापरायला हवी. यामुळे परफेक्ट लूक मिळतो.
लाली –
ब्लशसाठी डार्क आणि इंटेंस कलर्स टाळावेत. डार्क कलरमुळे वय अधिक दिसून येते. गालांवरती आणि मधील भागावर ब्लशर अप्लाय करू नये, केवळ उभारलेल्या भागाला हायलाइट करणे परफेक्ट असते.
भुवया –
आयब्रो लांब आणि जाड दिसावी म्हणून डार्क पेन्सिल वापरणे चुकीचे आहे हे लक्षात घ्यावे.
पावडर –
पूर्ण मेकअप झाल्यावर पावडर अप्लाय करणे आवश्यक आहे पण अगदी कमी मात्रेत. अति पावडर थोपल्याने सुरकुत्या दिसतात. त्वचा कोरडी पडते आणि पॅचेस दिसू लागतात. याने पूर्ण ग्लो नाहीसा होतो.
हेही वाचा – Tulip Bracelet: नव्या ट्रेंडमध्ये ‘ट्युलिप ब्रॅसलेट’ची एंट्री, फॅशनप्रेमींची पहिली पसंती
Comments are closed.