Maharashtra Din : 1 मे महाराष्ट्र दिन, वाचा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची गोष्ट




महाराष्ट्र निर्मिती दिन


मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा… सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून घुमणारा एकच आवाज म्हणजे ‘महाराष्ट्र’! 1 मे रोजी संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा करतं, पण या उत्सवामागे लपलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा तुम्हाला माहिती आहे का? आज त्याच संघर्षाची आणि विजयाची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

इतिहास –

1947 साली भारत स्वतंत्र झाला. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाची प्रादेशिक रचना खूप वेगळी होती. स्वातंत्र्यानंतर शेकडो राज्ये एकवटली गेली आणि देशाच्या कारभारासाठी राज्य व्यवस्था स्थापना करावी लागली. 1956 मध्ये राज्य पुनर्गठन अधिनियमाने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या मर्यादा निश्चित केल्या. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये 25 एप्रिल 1960 रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार अस्तित्त्वात आली. त्यानंतर 1 मे 1960 रोजी हा कायदा अंमलात आला. बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेले आणि दोन्ही स्वतंत्र राज्ये झाली. त्यामुळेच 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जोतो.

106 हुतात्म्यांचे स्मरण

स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याची एक चीड त्यावेळ धुमसत होती. 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. पोलिसांना हा मोर्चा आवरणे कठिण झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. परंतु,जमाव पांगला नाही. त्यामुळे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक मृत्युमुखी पडले. या हुतांत्माच्या बलिदानामुशे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने अखेर माघार घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.

हेही वाचा – Garbage Van : घंटा गाडीला मागे बाहुली का लावतात? वाचा यामागील रंजक कारण



Comments are closed.