Life Jacket: लाइफ जॅकेट म्हणजे ‘सेफ्टी’ असे नाही
जर तुम्हालाही समुद्रात सैर करण्याची, वॉटर गेम्स खेळण्याची, स्विमिंग करण्याची आवड असेल तर ही माहीती तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण समुद्रात सैर करताना, स्विमिंग करताना किंवा वॉटर गेम्स खेळताना अंगावर लाईफ जॅकेट घातलं की पूर्ण सुरक्षितता मिळते असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते अर्धसत्य आहे. कारण काही परिस्थितींमध्ये लाईफ जॅकेट अंगावर असतानाही बुडण्याचा धोका असतो. कोणत्या परिस्थितीमध्ये लाईफ जॅकेट तुमच संरक्षण करू शकत नाही ते समजून घेऊया.
लाइफ जॅकेट नीट न घालणे
जर लाइफ जॅकेट योग्य प्रकारे बांधलेलं नसेल किंवा सैल असेल, तर ते शरीरावरून निघू शकतं.
बेशुद्ध होणे
व्यक्ती पाण्यात पडताना डोक्याला मार लागला किंवा तब्येत बिघडली तर बेशुद्ध होऊ शकते. अशावेळी चेहरा पाण्याखाली जाऊ शकतो.
चुकीच लाइफ जॅकेट
सर्व लाइफ जॅकेट सारखे नसतात. काही फक्त तरंगायला मदत करतात, पण डोकं वर ठेवत नाहीत.
प्रवाही पाणी
मोठ्या लाटा किंवा जोरदार प्रवाहात, पाणी तोंडात-नाकात जाऊ शकतं.
हायपोथर्मिया
थंड पाण्यात शरीराचं तापमान कमी होतं, त्यामुळे शरीर काम करेनासं होतं..
अडकणे
जाळ्यात, दोऱ्यात किंवा बोटीत अडकण्यामुळे हालचाल करता येत नाही.
अतिआत्मविश्वास
काही जण लाइफ जॅकेट घातलं म्हणून निष्काळजी होतात, जे धोकादायक ठरू शकतं.
लाइफ जॅकेट जीव वाचवायला मदत करतं, पण योग्य वापर, सतर्कता आणि सुरक्षितता नियम पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे.
Comments are closed.