साधं पण स्टायलिश ! तरूणांमध्ये का वाढतेय Micro Weddingची क्रेझ?

एकेकाळी भारतीय लग्न म्हटलं की हजारो पाहुणे, भव्य मंडप, मोठा खर्च, अनेक दिवसांचा लग्नसोहळा असायचा. मात्र आता पाहुण्यांची गर्दी, अवाढव्य खर्च आणि धावपळ हे समीकरण बदलू लागलं आहे. सध्या तरुण पिढी मोठ्या थाटामाटापेक्षा ‘इंटिमेट वेडिंग’ अर्थात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत Micro Wedding करण्याला प्राधान्य देत आहे. ‘मिलेनिअल्स’ आणि ‘जेन-झी’ मध्ये ‘मायक्रो’ किंवा ‘इन्टिमेट वेडिंग’ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊयात बदलत्या लग्नकरण्याच्या पद्धतीविषयीसविस्तरपणे,

‘इंटिमेट वेडिंग’ म्हणजे काय?

इंटिमेट वेडिंग म्हणजे असं लग्न जेथे पाहुण्यांची संख्या मर्यादित (कमीत कमी 20 ते 50 आणि जास्तीत जास्त 100) असते. या वेडिंगमध्ये दिखाव्यापेक्षा क्लालिटी टाइम आणि नाते सांभाळणे याला जास्त महत्त्व दिले जाते.

फायदे

  • मायक्रो वेडिंगमध्ये पाहुण्यांची संख्या कमी असल्याने हॉल, जेवण आणि इतर खर्चात मोठी बचत होते.
  • वधू-वरांना प्रत्येक पाहुण्यांशी बोलता येते, धावपळ होत नाही.
  • कमी जागेत लग्नसोहळा होतो.
  • थीम बेस्ड लग्न करता येते.

हेही वाचा – Travel: Aesthetic Vibes साठी मुंबईतील ‘हे’ फोटोस्पॉट तरुणाईमध्ये हिट

ट्रेंड का वाढतोय?

  • भव्य वेडिंगमध्ये लाखो रुपये खर्च होतो. परंतू Micro Weddingमध्ये खर्च कमी होतो. त्यामुळे अनेक कपल्स या वेडिंग पद्धतला पसंती देत आहेत.
  • सोशल मीडियावर सध्या Aesthetic Wedding Themes मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यामुळे तरुणांमध्ये या लग्न प्रकारच्या लग्नाचे आकर्षण वाढले आहे.
  • मायक्रो वेडिंगमध्ये कमी पाहुणे असल्याने वेळ मिळतो. ज्यामुळे वातावरण अधिक कौटुंबिक बनते.

नियोजन कसे कराल?

  • पाहुण्यांची यादी काढताना फक्त जवळच्या लोकांचीच निवड करावी.
  • मोठा हॉल किंवा मैदान बूक करण्याऐवजी रिसॉर्ट, बाग, फार्महाऊस निवडावा.
  • कमी पाहुणे असल्याने वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करू शकता.

दरम्यान, काही कुटुंबांमध्ये मोठं लग्न करण्यालाच प्रतिष्ठेचं मानलं जातं. त्यामुळे या पद्धतीचा लग्नसोहळा केल्यास काही नातेवाईक नाराज होऊ शकतात. परंतू, तरीही शहरी भागातील तरुण पिढी हा बदल स्वीकारताना दिसत आहे.

हेही वाचा – Zip Coding Trend: Gen-Z मध्ये वाढतोय ‘झिप-कोडिंग’ रिलेशनशिप ट्रेंड

Comments are closed.