Skin Care: नैसर्गिक ग्लोसाठी घरीच बनवा गुलाबपाण्याचे आईस क्यूब्स




नैसर्गिक ग्लोसाठी घरीच बनवा गुलाबपाण्याचे आईस क्यूब्स


उन्हाळा सुरू झाला की त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर तेलकटपणा येणे, टॅनिंग आणि थकवा दिसणे अशा समस्या वाढू लागतात. यासाठी अनेकजण महागडी स्किन केअर उत्पादने वापरतात. मात्र घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारे गुलाबपाण्याचे आईस क्यूब्स त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. सध्या सोशल मीडियावरही हे आईस क्यूब्स मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत. हे क्यूब्स त्वचेला थंडावा देण्यासोबतच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात. (rose water ice cubes benefits)

गुलाबपाण्याचे आईस क्यूब्स कसे बनवायचे?

साहित्य:
१ कप शुद्ध गुलाबपाणी
बर्फाचा ट्रे
गुलाबाच्या काही पाकळ्या

कृती:
1) सर्वप्रथम एक स्वच्छ आईस ट्रे घ्या.
2) त्या ट्रेमध्ये शुद्ध गुलाबपाणी भरा.
3) प्रत्येक क्यूबमध्ये गुलाबाच्या काही पाकळ्या टाका. यामुळे क्यूब्स अधिक फ्रेश आणि आकर्षक दिसतात.
4) यानंतर ट्रे ५ ते ६ तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवा.
5) क्यूब्स पूर्णपणे गोठल्यानंतर ते वापरण्यास तयार होतील.

चेहऱ्यावर कसे वापरावे?
गुलाबपाण्याचा आईस क्यूब थेट चेहऱ्यावर हलक्या हाताने गोलाकार गतीने फिरवा. विशेषतः कपाळ, गाल आणि डोळ्यांच्या आसपास हळुवार मसाज करा. सुमारे 1 ते 2 मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा नैसर्गिकरित्या सुकू द्या आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. सकाळी वापरल्यास त्वचा अधिक फ्रेश दिसते. तसेच मेकअप करण्यापूर्वी वापरल्यास त्वचा अधिक स्मूथ आणि ग्लोइंग दिसू शकते.

त्वचेसाठी होणारे फायदे:
1) गुलाबपाणी आणि थंडावा मिळाल्यामुळे त्वचा फ्रेश आणि रिलॅक्स वाटते.
2) डोळ्यांखालील सूज आणि चेहऱ्यावरील थकवा कमी करण्यासाठी हे क्यूब्स उपयुक्त ठरतात.
3) नियमित वापरामुळे त्वचा अधिक चमकदार आणि हेल्दी दिसू शकते.
4) उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे होणारी जळजळ कमी करण्यास गुलाबपाणी मदत करू शकते.
5) आईस क्यूब्समुळे त्वचेला टाईटनिंग इफेक्ट मिळतो, ज्यामुळे चेहरा अधिक फ्रेश दिसतो.

महत्वाची टीप:
ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे त्यांनी हे क्यूब्स वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. तसेच आईस थेट जास्त वेळ त्वचेवर ठेवू नये.



Comments are closed.