इको फ्रेंडली डेकोर : इको फ्रेंडली होम डेकोरच्या अप्रतिम कल्पना
सध्या घराला निसर्गाच्या जवळ नेणारा एक नवा ट्रेंड सुरू आहे, तो म्हणजे ‘इको-फ्रेंडली होम डेकोर’. यामध्ये केवळ मातीची भांडी किंवा झाडेच नाही, तर घराचा कोपरा न कोपरा पर्यावरणपूरक कसा करता येईल याचा विचार केला जातो. आज आपण जाणून घेऊयात अशाच काही हटके आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या टिप्स ज्या तुमच्या घराचा कायापालट करू शकतात(Eco-Friendly Home Decor).
इनडोअर प्लांट्स-
घरात इनडोअर प्लांट्स लावल्यास रूम अधिक आकर्षक दिसतो आणि हवा शुद्ध राहण्यास मदत होते. तुम्ही यासाठी स्नेक प्लांट, मनी प्लांट, अरेका पाम यांसारखी झाडे लावू शकता.
बांबूचं फर्निचर –
घराला पर्यावरणपूरक लूक देण्यासाठी बांबू, कॅन किंवा वूडन फर्निचर वापरा. हे फर्निचर वजनाने हलके, स्टायलिश आणि इकोफ्रेंडली आहे.
हेही वाचा – कलरफुल कुशन्सने करा लिव्हिंग रुमचा मेकओव्हर
रिसायकल वस्तू –
जुन्या काचेच्या बाटल्या, रिकामे डबे किंवा लाकडी पेट्यांचा वापर करून आकर्षक फुलदाण्या किंवा शो-पीस तयार करा. यासह तुम्ही जुन्या साड्या किंवा कपड्यांपासून कुशन कव्हर्स, पायपुसणी किंवा पडदे बनवू शकता.
कापड –
घरातील पडदे, बेडशीट्स आणि सोफा कव्हर्ससाठी सिंथेटिक कपड्यांऐवजी सेंद्रिय कापूस (Organic Cotton), तागाचे कापड किंवा खादीचा वापर करा.
डेकोरेटिव्ह वस्तू –
प्लास्टिकच्या शोभेच्या वस्तू ऐवजी बांबू, वेत (Cane), ज्युट (ताग) आणि मातीच्या वस्तूंचा वापर करा.
प्रकाशयोजना –
घरात जास्तीत जास्त नैसर्गिक उजेड येईल अशी रचना करा. विजेची बचत करण्यासाठी एलईडी (LED) बल्बचा वापर करा आणि रात्रीच्या वेळी शक्य असल्यास सौर ऊर्जेवर चालणारे दिवे लावा.
हेही वाचा – घरासाठी रंग निवडताना Colour Psychology का लक्षात घ्यावी?
Comments are closed.