Rainy Season Plants Care : पाऊस पडताच बहरतात ही झाडे; आजच लावा कुंडीत
पावसाळा सुरू झाला की निसर्गाला एक वेगळाच बहर येतो. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेनंतर पडणाऱ्या पावसाच्या पहिल्या सरी मातीला सुगंधी बनवतात आणि हाच काळ घरातील बागेला टवटवीत आणि हिरवेगार करण्यासाठी उत्तम मानला जातो. जर यंदा पावसाळ्यात तुम्हालाही तुमची बाल्कनी हिरवीगार करायची असेल आणि घरातच निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात कोणती झाडे लावावीत हे पाहूयात.
मोगरा
पावसात मोगरा वेगाने वाढतो. या दिवसात तुम्ही जर मोगरा लावलात तर कळ्या भरपूर येतील. मोगऱ्यामुळे घर आणि बाल्कनी नैसर्गिक सुवासाने दरवळून जाईल.
हेही वाचा – फ्रिजमध्ये ठेवूनही टोमॅटो सडतात, फॉलो करा या स्मार्ट ट्रिक्स
कढीपत्ता
पदार्थाची चव वाढवणारा कढीपत्ता पावसाळ्यात खूप छान बहरतो. तुम्ही जर कुंडीत कढीपत्ता लावलात तर हिरवळ मिळेल शिवाय रोजच्या जेवणाची चवही वाढेल.
मनी प्लांट
जर तुमच्याकडे जागेची कमतरता असेल तर मनी प्लांट उत्तम पर्याय आहे. पावसाचे पाणी मिळताच या वेलीची पाने मोठी, चमकदार आणि अधिक हिरवीगार होतात. हे झाड तुम्ही बाल्कनीत सहज लावू शकता.
कोरफड
औषधी गुणांनी समृद्ध कोरफडची पावसाळ्यात लागवड करावी. या दिवसांत कोरफडीला जास्त पाणी देण्याची गरज नसते.
गवती चहा
पाऊस आणि चहा हे एक समीकरण आहे, त्यामुळे पावसाळ्यात बाल्कनीत गवती चहा लावू शकता. गवती चहाच्या चीव्र गंधामुळे पावसाळ्यात वाढणारे डास आणि कीटक घरापासून दूर राहतात.
टीप –
पावसात नवीन झाडे लावताना कुंडीच्या तळाशी असलेले छिद्र उघडी असल्याची खात्री करावी. यात जास्त पाणी साचू देऊ नये, कारण जास्तीचे पाणी साचून मुळे सडणार नाहीत.
हेही वाचा –चार्जरची वायर वारंवार तुटते? घरच्या घरी बनवा मजबूत Charger Protector
Comments are closed.