पापणी फडफडणं शुभ-अशुभ नाही, तर या गंभीर आजारांचे संकेत !
आपल्या समाजात डावा किंवा उजवा डोळा फडफडला की, लगेच त्याचा संबंध शुभ-अशुभ घटनांशी जोडला जातो. पण, विज्ञानाच्यादृष्टीने विचार केल्यास डोळा किंवा पापणी फडफडणे ही कोणतीही चमत्कारीक घटना नसून शरीराने दिलेला एक धोक्याचा इशारा असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर डोळ्यांची ही हालचाल दीर्घकाळ थांबत नसेल, तर ते एखाद्या गंभीर आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. आज आपण पापणी वारंवार फडफडणे यामागे कोणता आजार असू शकतो याची माहिती जाणून घेऊयात.
ताण
एका हेल्थ रिपोर्टनुसार स्ट्रेस हे डोळे फडफडण्याचं सर्वात मोठं कारण आहे. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा शरीर कोर्टिसोल हार्मोन्स सोडतं. यामुळे मज्जासंस्था हायपर अलर्ट मोडवर जाते. ज्यामुळे डोळ्यांच्या पापण्यांचे स्नायू आपोआप आकुंचन पावतात.
व्हिटामिनची कमतरता
मॅग्नेशियम हे स्नायूंना शिथिल करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. जेव्हा शरीरात याचे प्रमाण कमी होतं तेव्हा स्नायूंचं नियंत्रण बिघडतं आणि डोळे फडफडतात.
डोळयांचा थकवा
तासनतास मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप पाहिल्याने डोळ्यांच्या स्नायूंना सतत काम करावं लागतं, ज्यामुळे स्नायू थकतात. स्क्रीनकडे पाहताना आपण पापण्या कमी लवतो, ज्यामुळे डोळे कोरडे पडतात. हे कोरडेपण डोळ्यांना उत्तेजित करतं. परिणामी फडफड सुरू होते.
कॅफिन
कॅफिन हे असे उत्तेजक आहे जे हदयाचे ठोके आणि मज्जासंस्थेची गती वाढते. जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्याने पापण्यांचे स्नायू ओव्हर रिएक्ट करतात. जर तुम्ही जास्त कॉफी घेत असाल तर हा त्रास असू शकतो.
मद्यपान
मद्यपानामुळे डोळ्यांच्या नसा शिथिल होतात ज्यामुळे दृष्टी धूसर होणे आणि फडफडणे यांसारखे त्रास जाणवतात.
उपाय –
- दिवसातून किमान 7 तासांची झोप घ्यावी. झोप पूर्ण झाल्यास मेंदू आणि डोळ्यांचे स्नायू शांत होतात.
- आहारात मोड आलेली कडधान्ये खावीत.
- दर 20 मिनिटांनी 20 फूट लांब 20 सेंकद पाहावे.
महत्त्वाची टिप –
जर तुमच्या डोळ्यांची फडफड एक आठवड्यापेक्षा जास्त असेल तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
हेही वाचा – खाण्यापिण्याच्या या रोजच्या सवयी वाढवतात तुमचा स्ट्रेस
Comments are closed.