जगप्रसिद्ध पुरी खाजा, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या या गोड पदार्थाची खासियत काय?




महाप्रसाद भोजन


पुरी खाजा हा अतिशय खमंग, कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा पारंपरिक गोड पदार्थ आहे. हा प्रामुख्याने पुरी (ओडिशा) येथील जगन्नाथ मंदिरातील छप्पन भोग आणि महाप्रसाद म्हणून जगप्रसिद्ध आहे. हा जगप्रसिद्ध आणि तोंडात टाकताच विरघळणारा ‘पुरी खाजा’ गोड पदार्थ कसा बनवला जातो आणि त्याची खासियत काय जाणून घेऊयात.

पुरी खाजाची खासियत –

  • खाजाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यातील कागदासारखे अत्यंत पातळ आणि कुरकुरीत पदर.
  • पुरीचा खाजा हवाबंद डब्यात ठेवल्यास महिनाभर सहजपणे टिकतो.
  • कोणत्याही कृत्रिम रंगाचा किंवा फ्लेव्हरचा वापर न करता अत्यंत साध्या साहित्यापासून हा राजेशाही पदार्थ बनवला जातो.

साहित्य –

  • मैदा – २ कप
  • मीठ – चिमूटभर
  • वितळलेले तूप -4 ते 5 चमचे
  • तांदळाचे पीठ – 2 चमचे

कृती –

  • एका भांड्यात मैदा, चिमूटभर मीठ आणि वितळलेले तूप एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे थोडे कोमट पाणी घालून पुरीपेक्षा थोडे घट्ट पीठ मळून घ्या आणि 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा.
  • एका वाटीत 2 चमचे तूप आणि 2 चमचे तांदळाचे पीठ एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा.
  • मळलेल्या पिठाचे समान गोळे करा आणि त्यांची पातळ पोळी लाटून घ्या.
  • तयार केलेल्या तुपाची पेस्ट व्यवस्थित पसरा.
  • त्यावर थोडा मैदा भुरभुरा.
  • अशा प्रकारे 3 ते 4 पोळ्या एकमेकांवर रचून त्यांची घट्ट गुंडाळी बनवा.
  • आता या गुंडाळीचे छोटे तुकडे कापून घ्या आणि हलक्या हाताने थोडे लाटून पुरीसारखे आकार द्या .
  • कढईत मंद आचेवर तूप किंवा तेल गरम करा.
  • तयार केलेले खाजे हलके सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • एका भांड्यात 1 कप साखर आणि 1/2 कप पाणी घेऊन एकतारी पाक बनवा.
  • त्यात थोडी वेलची पावडर घाला.
  • तळून घेतलेले खाजे या पाकात बुडवा, जेणेकरून पाक आतपर्यंत जाईल.
  • त्यानंतर लगेच बाहेर काढून जाळीवर ठेवा.
  • कुरकुरीत व रसाळ पुरी खाजा खाण्यासाठी तयार आहे.

हेही वाचा – कपाळावरचा टिळा आणि भाग्योदय यांचा आहे थेट संबंध



Comments are closed.