फरार असतानाही हगवणे बाप-बेट्याचा राजेशाही थाट, बुडाखाली अलिशान गाड्या, ताटात मटणाची रास, पश्चात
पुणे: वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला कारणीभूत (Vaishnavi Hagawane Death) ठरलेला तिचा सासरा राजेंद्र हगवणे अखेर गजाआड गेला. सात दिवस पोलिसांना हुलकावणी देणारा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा सुशील यांनी पोलिसांनी बेड्या ठोकण्यात आल्या. पण फरार असताना हगवणेचे कारनामे ऐकला तर तुम्ही चाट पडाल. सुनेचा हुंडाबळी घेणारा हगवणे मटणावर ताव मारत मारत होता…महागड्या गाड्यांमधून फिरत होता. सुनेचा हुंडाबळी घेणाऱ्या हगवणेची फरार असताना अक्षरशः बडदास्त ठेवली गेल्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत. प्रवासासाठी राजेंद्र हगवणेला थार, बलेनो, एन्डेव्हर या गाड्या पुरवण्यात आल्या. तो जाईल तिथे मित्रमंडळींनी आपली फार्महाऊस, घरं त्याच्यासाठी उघडल्याचं समोर आलं आहे.(Vaishnavi Hagawane Death)
सात दिवसांत राजेंद्र हगवणे पोलिसांच्या मात्र हाती लागत नव्हता..
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तो 17 मे रोजी औंध हॉस्पिटल मुहूर्त लॉन्सला थार गाडीनं गेला…त्यानंतर वडगाव मावळ पवना डॅमवरच्या फार्म हाऊसमध्ये आणि शेवटी आळंदीतल्या लॉजवर मुक्कामाला गेला…
18 मे रोजी
वडगाव मावळ आणि
पवना डॅम इथं बंडू फाटक नावाच्या व्यक्तीकडे बलेनो गाडीनं पोहोचला
19 मे रोजी
सातारा जिल्ह्यातल्या पुसेगावमध्ये अमोल जाधव यांच्या शेतावर गेला
19 मे आणि 20 मे रोजी
पसरणीमार्गे बेळगाव जिल्ह्यातल्या कोगनोळीत जाऊन हॉटेल हेरीटेजमध्ये पोहोचला…
21 मे रोजी
कोगनोळीत प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर तो मुक्कामाला होता
22 मे रोजी
राजेंद्र हगवणे पुण्याला परत आला…
सात दिवसांत इतका प्नवास करणारा राजेंद्र हगवणे पोलिसांच्या मात्र हाती लागत नव्हता..
अटकेआधी हगवणे पितापुत्र पुण्यातल्या तळेगाव परिसरातच होते…एबीपी माझाच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना कशाचंही सोयरसुतक नसल्याचं दिसतंय..सुनेचा हुंडाबळी घेऊन फरार असणारे हगवणे पितापुत्र निर्लज्जपणे एका हॉटेलात चक्क मटणावर ताव मारत होते. अटक केल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर ना अपराधाचा भाव होता. ना पश्तातापाचा लवलेश. पत्रकारांनी पश्चात्ताप होतो का असा सवाल विचारला असता त्यावर नराधम राजेंद्र हगवणेनं हात हलवत नकारार्थी उत्तर दिलं. इतक्या उघडपणे मोकाट फिरणाऱ्या हगवणेंना पोलिसांनी अटक केली ते शरण आले असा प्रश्न विचारला जातोय.
पुणे पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांना कुठे-कुठे फ्री हँड दिला?
फरार झाल्यानंतर राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात होता, पण त्याला अटक करण्यात आली नाही. 20 मे रोजी बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कस्पटे कुटुंबीय वारजे पोलीस ठाण्यात गेले. आमची हद्द नाही, असं सांगत पीआय विश्वजीत कायंगडे यांनी तक्रार घेतली नाही. बावधन पोलीस स्टेशनचे पीआय विजय विभुते यांनीही कस्पटे कुटुंबीयांची तक्रार घेतली नाही. निलेश चव्हाणविरुद्ध बाळाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदला नाही
निलेश चव्हाणच्या बायकोची तक्रार गांभीर्यानं घेतली असती तर तो आज मोकाट नसता. निलेशच्या लॅपटॉपवरील अश्लील चित्रफितीत असणाऱ्या महिलांशी जबरदस्ती झाली का, याची पोलिसांनी चौकशी केली नाही. पोलीस व सरकार हे हंगामी पद्धतीने ॲक्शन मोडमध्ये येत आहे का? वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणातील पोलिसांचा तपास हलगर्जीपणाचा आहे. हलगर्जीपणा करणारे पोलीस आणि दुर्लक्ष करणारा महिला आयोग आहे, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले.
वैष्णवीच्या अंगावर अनेक खुणा असूनही हगवणे कुटुंबीयांवर सौम्य कलमं लावल्याचाही आरोप केला जातोय. वैष्णवीच्या कसेमध्ये संशय येण्यासारखा प्रकार आहे. कलमं लावली आहेत ती सौम्य प्रकारची आहेत. 19 खुणा वैष्णवीच्या अंगावर आहेत. आमचं म्हणणं आहे ती हत्या आहे. त्याचे कलम लागणे गरजेचे आहे, 302 ब ची आम्ही मागणी करतोय. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय, असे शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील पोलीस खाते प्रत्येक चौकी पोलीस स्टेशन हे राजकारण्यांच्या दबावाखाली काम करतात. हुंडाबळीच्या केसेस सुद्धा दबावाखाली चालवत असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकत असतील तर ही राजकारणाच्या बाबतीत खूप चिंताजनक परिस्थिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणते पोलीस अधिकारी रडारवर?
1. पीआय विश्वजीत कायंगडे
2. पीआय विजय विभुते
3. पीआय संतोष गिरी गोसावी
4. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड
5. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे वर होते
6. इग जॅलिन सुपकर
पोलिसांची पत्रकार परिषद चर्चेत
वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली. यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पण ती केवळ 1 मिनिटं 10 सेकंदात आटोपली. अशा संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी सव्वा मिनिटही न देणारे पुणे पोलीस टीकेचे धनी बनलेत. मुळातच वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली. वैष्णवीचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबीयांनी मोठी सून मयुरीचाही अतोनात छळ केला होता. मयुरीनं नोव्हेंबर 2024 मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली. गुन्हा दाखल होऊनही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी कारवाई केली नाही. मयुरीच्या मारहाणीपासून वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी पावलापावलाला हलगर्जीपणा केलाय. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळाची सहा दिवस आबाळ झाली.
अधिक पाहा..
Comments are closed.