अजित दादांच्या संघात जाणार का? वेळ येईल तेव्हा निर्णय घेईल, नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी बॅटिंग करुन नाशिक इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट मॅचचे उद्घाटन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी राजकीय टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. अजित दादांच्या संघात जाणार का? असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. यावर बोलताना रोहित पवारांनी चांगलीच राजकीय गुगली टाकल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

अजित दादांच्या संघात जाणार का? असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, टीमची निवड करत असताना बऱ्याच लोकांना वाटेल की मी त्यांच्या बाजूने असावं. माझ्यापेक्षा इतर पक्ष आहेत ते काय निर्णय घेतात?  आणि शेवटी खेळाडू म्हणून मी काय निर्णय घ्यायचा ते माझ्यावर असेल. वेळ येईल तेव्हा मी माझा निर्णय घेईल असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले.

अर्थकारण कसे करावे? हे नेत्यांना कळत नसावं

लाडकी बहीण योजनेवर देखील रोहित पवारांनी वक्तव्य केलं. लाडकी बहीण योजनांसाठी निधी देणे अवघड होते हे सर्वांना माहिती होते. निवडणुकीमध्ये महिलांनी सहकार्य केले आहे. आता अर्थकारण कसे करावे? हे नेत्यांना कळत नसावं त्यामुळे इतर विभागातील निधी वळविला जात असल्याचे रोहित पवार म्हणाले. इतर योजनांचे लाभ देणाऱ्या योजनांचा निधी बंद केला जातोय. यावर सरकारचे लक्ष नसल्याची टीका रोहित पवार यांनी केली. पवार साहेबांनी आदिवासी बांधवांसाठी निधी देण्याचा निर्णय 30 वर्षापूर्वी घेतला होता. पण आता तसे होत नाही
आदिवासी SC समाजeला योजनांचा लाभ मिळाला नाही तर त्यांचे हाल होतात असे रोहित पवार म्हणाले. इतर विभागाचा निधी न वळवीता राज्याचे उत्पन्न वाढवा असेही रोहित पवार म्हणाले.

गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहे. दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली आहे. तसेच अनेक जाहीर कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचे देखील पाहायला मिळाले होते.

महत्वाच्या बातम्या:

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, रोहित पवार अन् जयंत पाटलांना राज्यात संधी; लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा

अधिक पाहा..

Comments are closed.