अर्धवट शारीरिक संबंधाने बिनसलं, कुरिअरवाला नव्हे तर बॉयफ्रेंडच; कोंढवा प्रकरणात मोठा ट्विस्ट

पुणे : शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात पुणे (पुणे) तिथं काय उणे असं म्हणतात. मात्र, गेल्या काही महिन्यात पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी पाहता पुणे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, पुण्यातील कोंढवा परिसरातील 25 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, एका 28 ते 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं म्हटलं होतं. मात्र, या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आला असून अतिप्रसंग करणारा युवक हा तरुणीचा बॉयफ्रेंडच असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांशी शारिरीक संबंधात होते. मात्र, त्या दिवशी मुलीची इच्छा नसतानाही मुलाने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याने सगळं गणित बिघडलं. त्यामुळे, लव्ह (Love)सेक्स अन् धोका असा हा प्रकार असल्याचे समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कल्याणीनगर येथे एका आयटी कंपनीत कामाला असून दोन वर्षापासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता, बुधवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यामुळे, तिच्या प्रियकराने तरुणीची खोली गाठली अन् आपण कुरिअर बॉय असल्याचं परिसरात भासवलं. कुरिअर बॉयने अतिप्रसंग केल्याची फिर्यादही देण्यात आली होती. मात्र, पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बळजबरी करणारा युवक हा डिलिव्हरी बॉय नसून तरुणीचा बॉयफ्रेंडच होता. त्यावेळी, शारिरीक संबंध ठेवण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. मुलाने शारिरीक संबंध ठेवायची इच्छा व्यक्त केली. मात्र, तरुणीने मासिक पाळीचे कारण देत स्पष्ट नकार दिला. मात्र, तरुणाचा संयम सुटल्याने त्याने प्रेयसीवर शारिरीक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. त्यातून, दोघांमध्ये वाद झाला अन् तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठत डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग करण्यात आल्याची स्टोरी रंगवली. मात्र, पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर लव्ह, सेक्स अन् धोका.. असा धक्कादायक ट्रायअँगल समोर आला.

तरुण अन् तरुणीचे कुटुंबीय एकमेकांच्या परिचयाचे

कोंढवा प्रकरणातील तक्रारदार तरुणी आणि तिच्यासोबत त्या दिवशी फ्लॅटमध्ये असलेला तरुण गेल्या एक दीड वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. एवढच नाही तर दोघांचे कुटुंबही एकमेकांच्या परिचयाची आहेत. त्या 25 वर्षीय तरुणीसोबत मैत्री झाल्यानंतर तो तरुण तिच्या घरी ती एकटी असताना अनेकदा जायचा. सोसायटीच्या गेटवर असलेले सुरक्षा रक्षक येणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंद करुण घेतात. त्यामुळे आपण खरे नाव सांगितल्यास तरुणीच्या घरच्यांनी गेटवरचे रजीस्टर चेक केल्यास आपण घरी येऊन गेलो हे उघड होण्याचा धोका त्याला वाटत होता. त्यामुळे, दोघांनी मिळून शक्कल लढवली होती. प्रत्येकवेळी तो तरुण तो कुरिअर बॉय असल्याचं गेटवर सांगायचा आणि सुरक्षा रक्षकांनी खातरजमा करण्यासाठी फोन केल्यावर ती तरुणी त्यास दुजोरा द्यायची. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता दोघांचे भेटायचे ठरले. त्याप्रमाणे सव्वा 7 वाजता तो तरुण कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीच्या गेटमधून आतमधे आला आणि फ्लॅटमधे शिरला. त्यानंतर त्याने शरिरसंबंध ठेवण्याची मागणी तिच्याकडे केली. मात्र, मासिक पाळीचे कारण देत तरुणी त्यासाठी तयार नव्हती. पण, तरुणाला कंट्रोल न झाल्याने, त्याने फोर्स करत त्यांच्यात अर्धवट शारिरिक संबंध झाले. त्यानंतर सेल्फी काढून तरुण निघूनही गेला. मात्र, झाल्या प्रकारामुळे चिडलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार द्यायचं ठरवल. तत्पूर्वी, तिने तिच्या मित्राच थेट नाव न घेता एका अनोळखी कुरिअर बॉयने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. ती करण्याआधी स्वत:च्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील सगळा डेटाही डिलीट केला, जेणेकरुन पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळू नये. अशारितीने तरुणीनेच खोटी फिर्याद तयार केल्याचं तपासातून पुढे आलं आहे.

अमित शाहांच्या दौऱ्यामुळे पुणे पोलिसांचा वेगवान तपास

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने पुणे पोलीस वेगळ्याच दबावाखाली होते. त्यामुळे, पुण्यापासून दिल्लीपर्यंत तब्बल 200 पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. शेकडो सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज, हजारो कॉल रेकॉर्डस तपासण्यात आली. एवढंच नाही तर सर्व महत्वाच्या कुरिअर कंपन्यांच्या दिल्ली कार्यालयांशी संपर्क करुन त्यांच्याकडे काम करणाऱ्या कुरिअर बॉयची माहिती देखील मागवण्यात आली. दुसरीकडे पुण्यात ज्या प्रकरणामुळे खळबळ उडाली, त्यातील आरोपी आपणच आहोत याचा त्या तरुणाला पत्ताच नव्हता. गुरुवारी नेहमीप्रमाणे त्याने बाणेरमधील त्याच्या ऑफीसमधे काम केले. शुक्रवारी कुटुंबातील एकाचे लग्न असल्याने तो त्या लग्नात सहभागी झाला होता. पोलिसांनी या लग्नाच्या ठिकाणाहून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले अन् घडलेला सगळ्या प्रकरणातील लव्ह, सेक्स अन् धोका हा ट्रायअँगल समोर आला.

https://www.youtube.com/watch?v=z14abunbiiu

तरुणीने रचली स्टोरी, पोलिसांची क्वीक शोधमोहीम

पीडित तरुणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, कुरिअर बॉय म्हणून तो तरुण घरी आला. त्यावेळी तरुणीने कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. पण, त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे सांगितले आणि सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले. तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. त्यामुळे तिचे डोळे जळजळले अन् आरोपी घरात शिरला. त्यानंतर, तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला आणि पसार झाला. या आरोपीने मोबाईलमध्ये तिचे फोटो देखील काढले होते. मी परत येईन, असा मेसेज त्याने मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पुणे परिमंडळ 5 चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, अखेर हा सगळा बनाव असून तरुणीने कथोल्पित स्टोरी रचल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तब्बल 200 पोलिसांच्या टीम पुण्यापासून दिल्लीपर्यंत आरोपीच्या अटकेसाठी कार्यरत केल्या होत्या.

हेही वाचा

एकनाथ शिंदे म्हणाले ‘जय गुजरात’, मनोज जरांगेंची ‘खऊट’ प्रतिक्रिया; एका ओळीत मांडली भूमिका

आणखी वाचा

Comments are closed.