उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत देताच भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

राज ठाकरे आणि उदव थेकेडवरील प्रवीण दरेकर: उद्धव आणि मी 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, अशी मार्मिक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. तर बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर आज भेट झाली. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षदा टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

अशातच आता भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया आली असून उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी त्यांच्याच भिनली आहे आहे. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंट मधून झाला, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर (Praveen Darekar) यांनी केलं आहे.

भाजप आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाविषयी मळमळ आणि गरळ ओकण्याचे काम सध्या सुरु आहे. दोघांच्या भाषणात महिमामंडन सुरू आहे. देवेंद्रजी महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे लोकं फळं येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात. त्यामुळे आता आपलं कसं होणार? हेच आजच्या इव्हेंटवरुन दिसतंय असेही  भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी- प्रविण दरेकर

दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली राज ठाकरे मराठीचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत होते, स्पष्टीकरण देत होते, एकत्र येण्यासाठी आवाहन करत होते. मात्र सत्ता गेल्याचे वैषम्य उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसत होतं. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंटमधून झाला. झेंडे आणायचे की नाही, वर कोण बसायचं यावरुन सगळे कन्फ्यूज होते. राजकारणाचा दर्प या मेळाव्यात दिसत होता. उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी भिनली आहे. अशी टीका ही प्रविण दरेकर यांनी केली आहे.

मराठीला अभिजात दर्जा फडणवीस साहेबांच्या प्रयत्नानेच मिळाला- प्रविण दरेकर

मुंबई महापालिकेत कोण कंत्राटदार मोठे केलेत आणि किती मराठी होते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना किती मराठी माणसाचे हित जपले? सरकार मराठी माणसांच्या हितासाठी आपल्याला समर्थन देईल, यात दुमत नक्कीच नाही. भाजपनं सुद्धा मराठी माणसासाठी भूमिका घेतली आहे. अभिजात दर्जा देखील फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने मिळाला आहे. मराठी भाषा भवन तुमच्या काळात उभं राहू शकलं नाही हे देखील सत्य आहे असेही भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले.

भाषेसाठी नाही ही तर, निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी- आशिष शेलार

महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता ‘भाऊबंदकी’आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले, त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार, त्यासाठी सत्ता.. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे.  असेही ते म्हणाले. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरें यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंब “तहात” जिंकण्याचा प्रयत्न! असेही ते म्हणाले.

आणखी वाचा

मराठीजनाला हवाहवासा क्षण; राज-उद्धव यांची गळाभेट, विजयी मेळाव्यातील टॉप 10 फोटो

आणखी वाचा

Comments are closed.