राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा, उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र पराभवाचीच सल; विजयी मेळाव्य

राज ठाकरे उधव ठाकरे विजय रॅलीवरील शिवसेना शिंडे गट: महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लबोल केला.  एक गद्दार बोलला, जय गुजरात. किती लाचारी करायची? हिंदी सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा विचारांचा पाईक होईल का? असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आता यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भाषणात मराठीचा मुद्दा दिसला. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नेहमीप्रमाणे नटदृष्टपणा, टोमणे होते. मराठीचा मुद्दा कुठेही नव्हता. त्यांचा जो काही पराजय झालेला आहे त्याची सल त्या भाषणातून दिसून आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा पद्धतीने राज ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली होती. आता मुंबईच नाही तर महाराष्ट्राची सत्ता मला मिळवायची आहे तर राज ठाकरे यांनी सोबत यायला पाहिजे. युती  करायला पाहिजे, ही याचना त्यांच्या भाषणातून दिसून आल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर जय गुजरातचा नारा दिला. यावरून उद्धव ठाके यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एक गद्दार बोलला, जय गुजरात. किती लाचारी करायची? हिंदी सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा विचारांचा पाईक होईल का? असे त्यांनी म्हटले. हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर शक्ती अशी दाखवू पुन्हा डोकं वर काढणार नाही, असा गर्भित इशारादेखील त्यांनी दिला. म महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा सुद्धा आहे, आम्ही तो काबीज करू, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिले.

https://www.youtube.com/watch?v=Q7M4CVJFE-O

आणखी वाचा

Uddhav Thackeray Speech Today: म महापालिकेचा नाही, तर महाराष्ट्राचा सुद्धा, आम्ही तो काबीज करू; मराठी एकीची वज्रमुठ आवळत उद्धव ठाकरेंची ‘राज’साक्षीने विराट गर्जना

आणखी वाचा

Comments are closed.